केजरीवालांवर भाजपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; पाकिस्तान हल्ल्याच्या वक्तव्यावर संबित पात्रा भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:51 PM2021-05-26T21:51:46+5:302021-05-26T21:52:17+5:30

Bjp attack on Arvind Kejriwal's statement: जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असे केजरीवाल म्हणाले होते. 

BJP's 'surgical strike' on Arvind Kejriwal; Sambit patra angry over statement of Pakistan attack | केजरीवालांवर भाजपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; पाकिस्तान हल्ल्याच्या वक्तव्यावर संबित पात्रा भडकले

केजरीवालांवर भाजपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; पाकिस्तान हल्ल्याच्या वक्तव्यावर संबित पात्रा भडकले

Next

कोरोना लसीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जहरी टीका केली आहे. यावर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) भडकले असून त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर बोट दाखवणाऱ्या केजरीवालांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. (BJP got Angry on Arvind kejariwal's pak attack statement. remembering surgical strike statements.)


लसीच्या बाबतीत केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करून गेल्या चार दिवसांपासून 18 ते 44 वयाच्या नागरिकांचे लसीकरण बंद आहे. हे एकट्या दिल्लीतच नाही तर देशभरातील चित्र आहे. नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यापेक्षा आम्हाला आहेत तीच बंद करावी लागत आहेत, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर केली. केंद्र का खरेदी करत नाहीय? लसींची खरेदी आपण राज्यांवर सोडू शकत नाही. आपला देश कोरोनाविरोधात युद्ध लढत आहे. जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असे केजरीवाल म्हणाले होते. 


संबित पात्रा काय म्हणाले?
दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. मात्र, दु:खद म्हणजे केजरीवालांचे राजकारण सुरु आहे. आम्ही केजरीवालांना आज टीव्हीवर दोनदा पाहिले, त्यांचा उद्देश फक्त प्रचार करण्याचा होता. केंद्र सरकारकडून गेल्या 130 दिवसांत सर्व राज्यांना 20 कोटी कोरोना लसी पुरविल्या गेल्या आहेत. दिल्ली सरकारकडे आता 1.5 लाख लसी उपलब्ध आहेत. नियोजन आणि वितरण करणे दिल्ली सरकारचे काम आहे, पण केजरीवाल राजकारण करत आहेत, असे पात्रा म्हणाले. 


तुम्ही विचारलात की दिल्ली, उत्तर प्रदेश युद्धावेळी वेगवेगळी हत्यारे आणि दारुगोळा घेऊन लढणार का? परंतू आम्ही जेव्हा सर्जिकल स्ट्राईकवेळी एकत्र होऊन लढलो, तर तुम्हीच त्यावर प्रश्न उपस्थित करता, केजरीवालांनी यावर माफी मागायला हवी, अशी मागणी पात्रा यांनी केली. 

Web Title: BJP's 'surgical strike' on Arvind Kejriwal; Sambit patra angry over statement of Pakistan attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.