२०१९ ला देशाचा पंतप्रधान कोण? कार्यकर्त्यांत शांतता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 02:06 AM2018-10-27T02:06:41+5:302018-10-27T02:06:51+5:30

२०१९ ला कोणाला देशाचा पंतप्रधान करायचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला.

Who is the Prime Minister of the country in 2019? Workers Peace | २०१९ ला देशाचा पंतप्रधान कोण? कार्यकर्त्यांत शांतता

२०१९ ला देशाचा पंतप्रधान कोण? कार्यकर्त्यांत शांतता

Next

पिंपरी : निगडीत होणारी भाजपाची सभा मोठी झाली पाहिजे, लोकांना कळले पाहिजे की शिरूर आणि मावळ मतदारसंघात भाजपाने बैठक का घेतली, २०१९ ला कोणाला देशाचा पंतप्रधान करायचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांमध्ये शांतता पसरली होती. ‘कोणाचाच आवाज निघत नाही... अशी भाजपा नव्हती पाहिली’ अशी नाराजी दानवे यांनी व्यक्त केली.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतला. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हवेत राहू नका, हवेवर जाऊ नका, असा कानमंत्रही दिला. तीन नोव्हेंबरला प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर होणाऱ्या सभेला गर्दी जमविण्याचे आवाहन केले.
‘‘भाजपाची सभा मोठी झाली पाहिजे. लोकांना कळले पाहिजे, की शिरूर आणि मावळ मतदारसंघात भाजपाने बैठक का घेतली. २०१९ ला कोणाला देशाचा पंतप्रधान करायचे आहे, असा प्रश्न दानवे यांनी कार्यकर्त्यांना विचारला. मात्र कोणाचाही आवाज निघाला नाही. त्यावर दानवे म्हणाले, ‘‘कोणाचाच आवाज निघत नाही? अशी भाजपा पाहिली नव्हती.’’ अशी उपरोधिक टिप्पणी केल्याने कोणाला पंतप्रधान करायचे असे पुन्हा विचारल्यावर ‘मोदी’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले.
योग्य माणसाला मंत्रिपद
मंत्रिमंडळ विस्तारात पिंपरी-चिंचवड शहराला संधी मिळेल का, असे विचारले असता दानवे म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. योग्य माणसाला संधी दिली जाईल. त्याची प्रक्रिया सुरू आहे. नावेही दिली आहेत. त्यावर निर्णय होईल.’’
चिंचवडमधून केवळ
दहा हजार कार्यकर्ते?
भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणिक संघटनेचा आढावा घेतला. बूथची माहिती घेतली. सभेला किती कार्यकर्ते येणार आहेत, सीएम चषकचाही आढावा घेतला. चिंचवडमधून दहा हजार कार्यकर्ते येतील, असे या वेळी सांगितले. त्यावर संघटनमंत्री विजय पुराणिक म्हणाले, ‘‘चिंचवड मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे. ऐवढ्या मोठ्या मतदारसंघातून केवळ दहा हजारच कार्यकर्ते सभेला येणार?’’ त्यानंतर ‘पंधरा हजार येतील,’ असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
>भाजपामध्ये आयारामांचा भरणा झाला आहे. राजकीय वारे बदलेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बडे नेते भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांप्रमाणे आयाराम कार्यकर्त्यांना भाजपाची संस्कृती समजली नसल्याचे यातून समोर येते.’’
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

Web Title: Who is the Prime Minister of the country in 2019? Workers Peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.