पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:13 AM2018-05-10T03:13:49+5:302018-05-10T03:13:49+5:30

पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

Water crisis is in danger - Shravan Heridar | पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर

पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर

Next

पिंपरी : पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नदीतून रावेत येथील बंधाऱ्यात
पाणी येते. तेथून जलउपसा केंद्रातून पाणी उचलून जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. दिवसाला ४६० एमएलडी एवढे शहरासाठी पाण्याचे आरक्षण आहे. नागरीकरण वाढू लागल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कमी दाबाने पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत.
उन्हाळा तीव्र असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची कपात केली जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सूचित केले होते. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट येणार हे निश्चित होते. मात्र, महापौर नितीन काळजे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाणीकपातीला विरोध केला होता. पाण्याचे नियोजन करा, अशा सूचना केल्या होत्या. सध्या पवना धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा २९ टक्के होता. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात पाणीकपात झाली होती. दिवसाआड पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन यंदा कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती. या वर्षी पुरेसा साठा असल्याने पाणीकपातीचे संकट या वर्षी नसणार आहे, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने अर्थात एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पाणी वापरासंदर्भात एमआयडीसीने महापालिकेस सूचना केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पाणी बचत करा अन्यथा कपात करावी लागेल, असे पत्र महापालिकेला दिले होते. त्यामुळे पाणीवापराचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.

पवना धरणात यंदा पाण्याचा साठा पुरेसा आहे. नियमित पाणी पुरवठ्यानुसार सध्याचा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे यंदा पाणीकपात करण्याची किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची गरज नाही. २४ तास पाणी योजनेचे ४० टक्के भागाचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच उर्वरित ६० टक्के भागाचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणीगळती रोखून नागरिकांना पुरेसे पाणी देता येणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

Web Title: Water crisis is in danger - Shravan Heridar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.