भुलेश्वर वनक्षेत्रातील ओढ्या-नाल्यांतून वाळूतस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:51 PM2018-12-16T23:51:19+5:302018-12-16T23:52:30+5:30

वनविभागाचे दुर्लक्ष : वनसंपत्ती धोक्यात, यंत्राच्या साह्याने होतोय उपसा

Walnutskari in the Nile, Bhuleeshwar forest area | भुलेश्वर वनक्षेत्रातील ओढ्या-नाल्यांतून वाळूतस्करी

भुलेश्वर वनक्षेत्रातील ओढ्या-नाल्यांतून वाळूतस्करी

Next

यवत : दौंड तालुक्यातील वाळूमाफियांच्या नजरा नदीपत्रांमधून गावागावांतील ओढे, नाले, गाव तलाव यानंतर आता डोंगर दऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. भुलेश्वर पायथ्यालगत वनविभागाचे क्षेत्रात वनसंपदेचे नुकसान व डोंगर उतारावर यांत्रिक सामग्रीने ओढ्या नाल्यात उत्खनन करून शेकडो ब्रास वाळूची तस्करी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या क्षेत्रात उत्खनन झाल्यानंतरही या प्रकाराबाबत वनविभाग अनभिज्ञ आहेत.

जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या घाटात वाळूची तस्करी करण्यात आली आहे. भुलेश्वर घाटात वन विभागाचे शेकडो हेक्टर क्षेत्र आहे. या वन क्षेत्रात वन्य जीवदेखील मोठ्या आढळून येतात. मात्र, या वन क्षेत्रात आवश्यक काळजी वन विभागाकडून घेतली जात नसल्याचे समोर येत आहे. सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबपर्यंत डोंगर दºयांमधून उत्खनन होऊनही वनविभागाला याची कल्पनाही नाही. वाळू तस्करी झालेल्या भागात वृक्षांची तोडदेखील करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून वनक्षेत्रात मोठे नुकसान केल्याचे दिसून येत आहे. वाळूच्या तस्करीबरोबर वाळूतस्करांनी आणखी कशा कशाची तस्करी येथून केली असेल, याची आता चौकशी होण्याची आवश्यकता आहे. वाळू तस्करीबरोबर या भागात असणारी हरणे, काळवीट आदी प्राण्यांच्या बाबतीत काही घडले आहे का, याचीही शहानिशा होणे आवश्यक आहे.

वाळूतस्करांमुळे वृक्षलागवड मोहीम धोक्यात
४शासनाने सामाजिक वनीकरणसाठी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च केला आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, वृक्षलागवड आदी पर्यावरणाच्या पूरक गोष्टींसाठी वर्षानुवर्षे मोठ्या प्रयत्नाने वन्यप्राणी, झाडे संवर्धन उपक्रम राबविण्यात आले आहेत. मात्र वाळूतस्करांमुळे शासनाचा उपक्रम संपुष्टात येत आहे. भुलेश्वरच्या डोंगरदºयांना विशेष इतिहास आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा अनोखा ठेवा असलेले शंभो महादेवाचे मंदिर डोंगरांच्या सर्वोच्च ठिकाणी आहे.

४याचबरोबर येथील डोंगरदºयांचे संवर्धन करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व तरुणाचे समूह काम करीत आहेत. यवतमधील काही तरुणांनी एकत्र येत शेकडो वृक्षांची लागवड करण्याबरोबरच सुटीच्या वेळी वेळ काढून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची मोहीम मागील काही वर्षांपासून चालू ठेवल्याने येथे वृक्षांची संख्या वाढली आहे. मात्र, शासनाच्या वन विभागाकडून काळजी घेतली जात नसल्याने येथे वाळूतस्करांचे चांगलेच फावले आहे.

४भुलेश्वरच्या डोंगर दºयात वाळूसाठी मोठे उत्खनन
४वन विभागाच्या हद्दीत उत्खनन होत असताना वन विभाग मात्र झोपेत
४सुमारे ५०० ट्रक वाळूची चोरी
४वन विभागाच्या हद्दीत वृक्षतोडीबरोबरच वन्य जीवही धोक्यात
४वनांच्या हद्दीतून बेकायदा रस्ते
 

Web Title: Walnutskari in the Nile, Bhuleeshwar forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.