ताबा सुटल्याने ट्रक धडकला दुभाजकाला; पिंपरी चिंचवड येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:31 AM2017-12-20T11:31:30+5:302017-12-20T11:40:33+5:30

ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकची रस्ता दुभाजकाला धडक झाली. पुणे-मुंबई महामार्गाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सकाळी ही घटना घडली.

Truck dashing to divider out after control; accident in Pimpri Chinchwad | ताबा सुटल्याने ट्रक धडकला दुभाजकाला; पिंपरी चिंचवड येथील प्रकार

ताबा सुटल्याने ट्रक धडकला दुभाजकाला; पिंपरी चिंचवड येथील प्रकार

Next
ठळक मुद्देपुणे-मुंबई महामार्गाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली घटना घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान

चिंचवड : अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकची रस्ता दुभाजकाला धडक झाली. पुणे-मुंबई महामार्गाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार लोखंडी साहित्य घेऊन जाण्याऱ्या ट्रकला वाहतूक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता दुभाजकाला धडकला. या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होती. या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चिंचवड वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Truck dashing to divider out after control; accident in Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.