मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात : खालापूरजवळ 2 कारची धडक झाल्यानं तिघांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 10:18 AM2017-12-20T10:18:55+5:302017-12-20T12:59:10+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. दोन कार एकमेकांना धडकल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident on Mumbai-Pune Expressway near by Khalapur | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात : खालापूरजवळ 2 कारची धडक झाल्यानं तिघांचा जागीच मृत्यू 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात : खालापूरजवळ 2 कारची धडक झाल्यानं तिघांचा जागीच मृत्यू 

Next

रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. दोन कार एकमेकांना धडकल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झाले आहेत. मुंबईला येणा-या मार्गावर खालापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे.  कारचा टायर फुटल्यानं हा भीषण अपघात झाला आहे. पनवेलमधील खासगी रुग्णालयात जखमींना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा (एमएच ०४ सीजे ०४२३) कारचं मागील टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ती समोरुन येणा-या कारवर जाऊन आदळली. दरम्यान, या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.  


 

Web Title: Accident on Mumbai-Pune Expressway near by Khalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.