टाटा मोटर्सच्या कामगारांना २९ हजार बोनस; कंपनी व्यवस्थापन व युनियनमध्ये करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:13 AM2017-09-27T05:13:53+5:302017-09-27T05:13:59+5:30

टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता बोनस आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता सानुग्रह अनुदानाबाबत मंगळवारी करार झाला.

Tata Motors workers get 29 thousand bonus; Agreement between company management and union | टाटा मोटर्सच्या कामगारांना २९ हजार बोनस; कंपनी व्यवस्थापन व युनियनमध्ये करार

टाटा मोटर्सच्या कामगारांना २९ हजार बोनस; कंपनी व्यवस्थापन व युनियनमध्ये करार

Next

पिंपरी : टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता बोनस आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता सानुग्रह अनुदानाबाबत मंगळवारी करार झाला. या करारामुळे कंपनीतील कामगारांना सुमारे २९ हजार रुपये दिवाळी बोनस आणि सानुग्रह रक्कम मिळणार आहे.
करारावर व्यवस्थापनातर्फे अलोक सिंग (युनिट प्रमुख - पुणे वर्क्स), सरफाज मणेर (मनुष्यबळ विभागाचे - सीव्हीबीयू) व इतर व्यवस्थापन अधिकारी यांनी स्वाक्षरी केली. तर युनियनच्या वतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष सतीश काकडे, सरचिटणीस उत्तम चौधरी, खजिनदार गणेश फलके, संयुक्त सचिव अबीदअली सय्यद, कार्यकारिणी सदस्य महेंद्र कदम, सुनील रसाळ, राम भगत, प्रतिनिधी विलास सपकाळ, विक्रम बालवडकर यांनी करारावर स्वाक्षरी केली.
दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या करारामुळे कंपनीत उत्साहाचे वातावरण आहे. कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

- गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे उद्दिष्ट गाठत उत्पादन खर्चात कपात केली असून, कंपनीने ही रक्कम कामगारांसाठी बोनस जाहीर केली आहे. तसेच कंपनीच्या सुपरअ‍ॅन्युएशन योजनेत समाविष्ट असलेल्या कामगारांना ८ हजार ५५० रुपये ही अ‍ॅडहॉक रक्कम देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या वेळी कंपनीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश बोरवणकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि उत्पादन खर्चात कपात यासाठी कामगारांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Tata Motors workers get 29 thousand bonus; Agreement between company management and union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.