महागाईचे श्राद्ध आंदोलन, इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:46 AM2017-09-16T02:46:30+5:302017-09-16T02:47:04+5:30

पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने श्राद्ध आंदोलन केले. पितृपंधरवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल, डिझेल, गॅसचे श्राद्ध, वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केले.

 Shraddha movement of inflation, prohibition of fuel price hike by NCP | महागाईचे श्राद्ध आंदोलन, इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध  

महागाईचे श्राद्ध आंदोलन, इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध  

Next

पिंपरी : पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने श्राद्ध आंदोलन केले. पितृपंधरवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल, डिझेल, गॅसचे श्राद्ध, वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केले.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, दत्ता साने, अपर्णा डोके, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, संघटक विजय लोखंडे, सुलक्षणा धर, अनुराधा गोफणे, निकिता कदम, मंदा आल्हाट, गंगा धेंडे, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप, तानाजी खाडे, अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, आनंदा यादव, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, विशाल वाकडकर, संतोष वाघेरे, अमित बच्छाव आदी सहभागी झाले होते.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले, ‘‘पेट्रोलच्या दरामध्ये दररोज वाढ होत आहे. दररोज दर बदलून जनतेची लूट केली जात आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये तब्बल १८ रुपयांनी पेट्रोल वाढले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भरमसाट दरवाढ झाली असून, महागाई गगनाला भिडली आहे. भाजपा सरकारचे हेच का अच्छे दिन? महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.’’
भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजपाने सत्ता मिळविली. भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, तरी त्यांना सत्ता चालविता येत नाही. चार वर्षांत महागाई गगनाला भिडली आहे. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना त्यांचे राजीनामे घेणे गरजेचे आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना ‘क्लीन चीट’ देत सुटले आहेत. हे निषेधार्ह आहे.’’

कोणीच नाही सुखी : त्वरित कर्जमाफी व्हावी
भाजपा सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, नोकरदार कोणीच सुखी नाही. शेतकºयांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही. सरकारने शेतकºयांचे कर्ज त्वरित माफ करावे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना एक रुपयाची दरवाढ झाली, तरी भाजपाचे लोक आंदोलन करीत होते. आता जीवनावश्य वस्तूमंध्ये भरमसाट वाढ झाली आहे. पेट्रोल ८० रुपये लिटर झाले आहे. आंदोलन करणारे कोठे गेले आहेत? सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर त्वरित कमी करावेत, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले.

Web Title:  Shraddha movement of inflation, prohibition of fuel price hike by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे