शाळेतील ‘लालबत्ती’ खेळ ठरतोय धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 03:53 PM2017-09-27T15:53:04+5:302017-09-27T15:54:11+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या एक वेगळ्या खेळाची चर्चा होतेय.

The school's 'Lalbatti' game is dangerous due to it | शाळेतील ‘लालबत्ती’ खेळ ठरतोय धोकादायक

शाळेतील ‘लालबत्ती’ खेळ ठरतोय धोकादायक

Next
ठळक मुद्दे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या एक वेगळ्या खेळाची चर्चा होतेय. तो खेळ म्हणजे लालबत्ती. तुमचा पाल्य जर शाळेत जाऊन अशा प्रकारचा खेळ खेळत असेल, तर वेळीच त्याला सावध करण्याची आवश्यकता आहे.

- स्वप्निल हजारे 

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या एक वेगळ्या खेळाची चर्चा होतेय. तो खेळ म्हणजे लालबत्ती.  तुमचा पाल्य जर शाळेत जाऊन अशा प्रकारचा खेळ खेळत असेल, तर वेळीच त्याला सावध करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हा खेळ विद्यार्थ्यांसाठी धोकादायक व जीवघेणा ठरू शकतो.  पुर्वी तुम्ही आम्ही, गंमत म्हणून ‘लालबत्ती’ हा खेळ खेळला असाल. पण गंमत म्हणून खेळला जाणारा हा खेळ सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महाविद्यालयात विद्याथ्र्याचा छंद होऊ लागला आहे. हा विद्यार्थ्यांचा खेळ तुमच्या पाल्याच्या जीवावरही बेतू शकतो. त्याविषयीची घटना नुकतीच कुदळवाडीतील एका खासगी शाळेत घडला. या खेळाच्या निमित्ताने एका विद्याथ्र्याला मित्रंनी जबर मारहाण केली. हे प्रकरण अगदी पोलीस चौकीर्पयत गेले. 

खेळातील हे  प्रकरण पोलिसांपर्यत पोहचल्यानंतर या खेळातील गांभीर्य सर्वासमोर आला. पोलिसांनी विद्याथ्र्यांना व शाळेला  समज देऊन हे प्रकरण समुपदेशनाद्वारे हातळले.  आता हा जीवघेणा खेळ रोखण्यासाठी शाळा, पालक तसेच पोलिसांनीही विशेष पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 

काय आहे लालबत्ती खेळ
या खेळात एका मुलाला लक्ष्य करून त्याच्या तोडांवर जर्कीन अथवा स्वेटर टाकले जाते. मग दहा ते बारा मुलांकडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली जाते. असाच प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडीतील एका खाजगी शाळेत काही दिवसापूर्वी  घडला. या शाळेतील नववीत शिकणा:या एका मुलांला दहा ते बारा मित्रंनी माराहण केली.त्यात तो जखमी झाला होता. 

पोलीसकाका उपक्रम
पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांनी प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन ‘पोलिस काका’ उपक्रम सुरू केला आहे.  शाळेत जाऊन विद्याथ्र्याना समुपदेशन केले जात आहे. सध्या या उपक्रमांचे अनेक शाळा, महाविद्यालयाने स्वागत केले असून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
 

Web Title: The school's 'Lalbatti' game is dangerous due to it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.