उलट दिशेने वाहन चालविणारे पकडल्यास पोलिसांना बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:26 AM2018-12-28T01:26:29+5:302018-12-28T01:26:49+5:30

वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष वेधले आहे.

Reward the police if the driver is caught in the opposite direction | उलट दिशेने वाहन चालविणारे पकडल्यास पोलिसांना बक्षीस

उलट दिशेने वाहन चालविणारे पकडल्यास पोलिसांना बक्षीस

Next

पिंपरी : वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष वेधले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. उलट दिशेने वाहन चालविणाºया वाहनचालकांना पकडून
कारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयांसाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी बक्षीस योजना जाहीर केली आहे. दुचाकी पकडल्यास १०० रुपये, चारचाकी पकडल्यास ५०० रुपये अशा स्वरुपाची ही बक्षीस योजना आहे.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघाताला आमंत्रण देणारे, स्वत:सह दुसºयांच्या जिवाला धोका निर्माण करणाºयांना शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी सप्टेंबर २०१८ ला कठोर भूमिका घेतली. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात उलट दिशेने वाहन चालविणाºयांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली. उलट दिशेने निष्काळजीपणे वाहन चालवून धोकादायक परिस्थिती निर्माण करणाºया वाहनचालकांवर भारतीय दंडसंहिता कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करा, असे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर कारवाईची मोहीम सुरू झाली. सुमारे साडेसहाशे वाहनचालकांवर कारवाईसुद्धा झाली. मध्यंतरी ही मोहीम थोडी थंडावली होती. पुणे शहर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये हेल्मेट सक्तीची मोहीम पुन्हा अमलात आणली. त्या वेळी आयुक्त पद्मनाभन यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्याप्रमाणे हेल्मेट सक्तीची मोहीम राबविणार नसल्याचे स्पष्ट केले. दुचाकी वाहनचालकांना स्वत:चे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हेल्मेट वापरणे महत्त्वाचे ठरते. परंतु उलट दिशेने वाहन चालविणारे स्वत:सह दुसºयाच्या जिवीताला धोका निर्माण करतात. उलट दिशेने वाहन चालविणाºयांवर कारवाई होते, त्या वेळी हेल्मेट, नंबरप्लेट, विमा, प्रदूषणाबाबतचे प्रमाणपत्र याबाबतही चौकशी करून माहिती घेतली जाते. असे आयुक्तांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलीस जेवढ्या बेश्स्ति वाहनचालकांवर कारवाई करतील, तेवढ्या प्रमाणात त्यांना बक्षिसाची रक्कम मिळेल, अशी ही योजना असल्याने वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनचालकांना पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद
उलट दिशेने वाहन चालविणाºया वाहनचालकाला भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ नुसार विशिष्ट कालावधीसाठी कारावासाची शिक्षा सुनावली जाते. त्यात सहा महिन्यांपर्यंत वाढ करण्याची तरतूद आहे. कारावास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अपघात घडला तरच गुन्हा दाखल होईल, असे नाही.
धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याच्या कारणावरूनसुद्धा उलट
दिशेने येणाºया वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. वाहतूक पोलीस शक्यतो मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करतात. मात्र उलट दिशेने वाहने चालविणाºयांविरुद्ध मोटार वाहन कायद्याऐवजी भारतीय दंड संहिता कलम २७९ नुसार कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

Web Title: Reward the police if the driver is caught in the opposite direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.