कांद्याची आवक निम्म्याने घटून भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:42 AM2018-08-27T00:42:26+5:302018-08-27T00:42:56+5:30

चाकण बाजार : बटाटा आवक ६८२ क्विंटलने घटून भाव स्थिर; कांदा ११०० रुपये, तर बटाटा १७०० रुपये क्विंटल

Reduce onion yield by half and increase in prices | कांद्याची आवक निम्म्याने घटून भावात वाढ

कांद्याची आवक निम्म्याने घटून भावात वाढ

googlenewsNext

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक निम्म्याने घटून १३० रुपयांनी भाव घटले. बटाटा आवक ६८२ क्विंटलने घटून भाव स्थिर राहिले. तरकारी बाजारात वांगी, काकडी, गवार, ढोबळी, चवळीचे भाव वाढले, तर कोबी, फ्लॉवर, दोडका, कारली, वालवड, शेवग्याचे भाव स्थिर राहिले. काकडी, फरशी, ढोबळी व दुधी भोपळ्याची आवक वाढली. कोथिंबिरीची आवक वाढली, तर मेथी, कोथिंबीर, शेपू व पालकचे भाव वाढले. जनावरांच्या बाजारात बैल व म्हशींची विक्री वाढली, तर गाय व शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत घट झाली असून बाजारात एकूण दीड कोटीची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ३५० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव ११०० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ११०० क्विंटल झाली. बटाट्याचा कमाल भाव १७०० रुपयांवर स्थिर राहिला. भुईमूग शेंगांची १० क्विंटल आवक झाली. लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव २ हजार ५०० रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ४२५ पोती झाली. मिरचीचा भाव ३००० रुपयांवर
स्थिर झाला. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची ४,१५००० हजार जुड्यांची आवक होऊन २०० ते ७०० रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर ३ लाख ८५ हजार जुड्यांची आवक होऊन १०१ ते ५०० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक ७०००० हजार जुड्या झाली. २०१ ते ४०० असा जुड्यांना
भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :
कांदा - एकूण आवक - ३५० क्विंटल. भाव क्रमांक १ : ११३० रुपये, भाव क्रमांक : १००० रुपये, भाव क्रमांक ३ : ८०० रुपये.
बटाटा - एकूण आवक - ११०० क्विंटल. भाव क्रमांक १ : १७०० रुपये, भाव क्रमांक २ : १५०० रुपये, भाव क्रमांक ३ : १२०० रुपये. भुईमूग शेंग एकूण आवक - १० क्विंटल, भाव क्रमांक १ : ५०००, भाव क्रमांक २ : ४५००, भाव क्रमांक ३ : ४००० रुपये .लसूण - एकूण आवक - २५ क्विंटल. भाव क्रमांक १ : २५०० रुपये, भाव क्रमांक २ : २००० रुपये, भाव क्रमांक ३ : १८०० रुपये.

पालेभाज्या :
चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यामध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :
मेथी - एकूण १२३४० जुड्या (४०० ते ८०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २४५३० जुड्या (५०० ते ९०० रुपये ), शेपू - एकूण ४५२० जुड्या (३०० ते ६०० रुपये), पालक - एकूण ३२९० जुड्या
(५०० ते ८०० रुपये ).

फळभाज्या :
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :
च्टोमॅटो : ९७२ पेट्या (५०० ते १००० रु.), कोबी : ३४१ पोती (५०० ते १००० रु.) फ्लॉवर - ३१८ पोती (४०० ते ८०० रु.), वांगी - ५१८ - पोती (२००० ते ३००० रु.), भेंडी - ३९४ पोती (२००० ते ३००० रु.), दोडका - २६९ पोती (२००० ते ३००० रु.) कारली : ३१८ डाग (१५०० ते २५०० रु.), दुधीभोपळा - ३१८ पोती (५०० ते १५०० रु.), काकडी - ३८१ पोती (५०० ते १२०० रु.), फरशी - १९४ पोती (१५०० ते २००० रु.), वालवड - १३२ पोती (२५०० ते ३५०० रु.), गवार - १६४ पोती (३००० ते ४००० रू.), ढोबळी मिरची - ५१८ डाग (१००० ते २००० रु.), चवळी - १९० पोती (१००० ते २५०० रु.), वाटाणा - ३१८ पोती (२००० ते ३२०० रु.), शेवगा - ४१ डाग (३५०० ते ४५०० रु.), हिरवी मिरची - ३३९ पोती ( १५०० ते २५०० रु.)
जनावरे :
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १५० जर्शी गार्ईंपैकी ९५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रुपये), १४० बैलांपैकी ७५ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ३०,००० रुपये ), ९५ म्हशींपैकी ६५ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ८०,००० रुपये ),
शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३२५० पैकी २५७० शेळ्या-मेंढ्याची विक्री होऊन त्यांना (१५०० ते ९,००० ) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात एकूण ९० लाख रुपये उलाढाल झाली.

Web Title: Reduce onion yield by half and increase in prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.