पोलीस कर्मचारी महिलेच्या मुलाचा खून, चार जणांविरूद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 08:30 PM2017-09-11T20:30:01+5:302017-09-11T20:34:17+5:30

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणा-या आदित्य जैद (वय १८) या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

The police officer filed a case against the murder of the son of the woman, and four people in Pimpri police station | पोलीस कर्मचारी महिलेच्या मुलाचा खून, चार जणांविरूद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस कर्मचारी महिलेच्या मुलाचा खून, चार जणांविरूद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी, दि. 11 - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणा-या आदित्य जैद (वय १८) या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जखमी आदित्यला भोसरी- मोशी रस्त्यावरील खासगी रूग्णालयात दाखल करून मारहाण करणारे विद्यार्थी पसार झाले. चार जणांविरूद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आदित्य हा निगडी पोलीस ठाण्यात हवालदार पदावर सेवेत असलेल्या सुनीता जैद यांचा  मुलगा आहे. 

चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणा-या अदित्यला महाविद्यालयातील काही तरुणांनी मोटारीत बसवून मोशी परिसरात नेले. त्याच्याबद्दल मनात राग असल्याने त्यांनी मोशीजवळ त्याला लाथा, बुक्यांनी मारहाण केली. बेदम मारहाणीत अदित्य गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करून आरोपी पसार झाले. उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्यचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वायसीएम रूग्णालयात पाठविण्यात आला. पिंपरी पोलिसांकडे चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. मुलीच्या प्रेमप्रकरणातुन हा प्रकार घडला असावा,असा अंदाज व्यकत करण्यात येत आहे. 

Web Title: The police officer filed a case against the murder of the son of the woman, and four people in Pimpri police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा