कवींचे शब्द हसवतात, तर कधी रडवतात : ए. के. शेख; काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:11 PM2018-02-06T12:11:17+5:302018-02-06T12:15:11+5:30

परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो, म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात, तर कधी रडवतात, असे उद्गार गझलकार ए. के. शेख यांनी निगडी-प्राधिकरण येथे काढले.

Poetic words laugh, and sometimes cry : A. K. Sheikh; Publications of Poetry store in Pune | कवींचे शब्द हसवतात, तर कधी रडवतात : ए. के. शेख; काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवींचे शब्द हसवतात, तर कधी रडवतात : ए. के. शेख; काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

Next
ठळक मुद्दे ‘तुझ्याविना’ या गझलसंग्रहाचे, ‘जीवनगाणे’ या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्यानंतर ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली झाले़ कविसंमेलन

निगडी : परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो, म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात, तर कधी रडवतात, असे उद्गार  गझलकार ए. के. शेख यांनी निगडी-प्राधिकरण येथे काढले.
कवी बी. एस. बनसोडेलिखित, साहित्यसुधा आणि सूरज पब्लिकेशन आयोजित ‘तुझ्याविना’ या गझलसंग्रहाच्या आणि ‘जीवनगाणे’ या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ए. के. शेख बोलत होते. प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते ‘तुझ्याविना’ या गझलसंग्रहाचे; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड) शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते ‘जीवनगाणे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, डॉ. हेमंत हुईलगोळकर, कवी बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रकाशन सोहळ्यानंतर ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले़. रघुनाथ पाटील, दीपेश सुराणा, अशोक कोठारी, डॉ. सुधीर काटे, दीपक अमोलिक, आय. के. शेख, दत्तू ठोकळे, राजेंद्र सोनवणे, महेंद्र गायकवाड यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. नंदीन सरीन यांनी गझलगायन कले.

Web Title: Poetic words laugh, and sometimes cry : A. K. Sheikh; Publications of Poetry store in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.