Pimpri Chinchwad NCP corporator's protest against duplicity of ruling BJP | सत्ताधारी भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीच्या नगरसेविकेकडून निषेध 
सत्ताधारी भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीच्या नगरसेविकेकडून निषेध 

ठळक मुद्देसोनवणे यांनी महापालिका सभेत भाजपच्या दुजाभावाच्या भूमिकेचा केला निषेधविरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेविका मंगला कदम यांनी केले सोनवणे यांच्या निषेधाचे समर्थन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे यांनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करताना दुजाभाव केला होता.
गेल्या महिन्यात पौर्णिमा सोनवणे यांनी महापालिका मुख्यालयात कचरा टाकला होता. त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी देखील अनधिकृत फलक आणून मुख्यालयासमोर टाकले होते. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनवणे यांनी महापालिका सभेत प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या दुजाभावाच्या भूमिकेचा निषेध केला.
सोनवणे यांच्या निषेधाचे समर्थन करत विरोधी पक्षनेते योगेश बहल आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी प्रशासनासह सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त करत जोरदार टिका केली.


Web Title: Pimpri Chinchwad NCP corporator's protest against duplicity of ruling BJP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.