पालकांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे - राहुल सोलापूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:31 AM2018-08-18T00:31:12+5:302018-08-18T00:31:32+5:30

चांगले गुण मिळाले नाही म्हणून अपयश येत नसते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Parents should pay attention to the overall development - Rahul Solapurkar | पालकांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे - राहुल सोलापूरकर

पालकांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे - राहुल सोलापूरकर

Next

पिंपरी - चांगले गुण मिळाले नाही म्हणून अपयश येत नसते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अव्वल येण्याची जीवघेणी स्पर्धा करू नये, मुलांमधील गुणांचा विचार करून त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांचे भविष्य घडवावे, असे मत प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
चिंचवड काशीधाम मंगल कार्यालयात युनिक व्हिजन अ‍ॅकॅडमीच्या वतीने चिंचवडमधील यशस्वी गुणवंत विद्यार्थांचा युनिक स्टुडंट पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. युनिक स्टुडंट पुरस्काराचे वितरण करण्यात आले. व्यासपीठावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, महापालिका शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अनंत कोºहाळे , क्रांतितीर्थ संस्थेचे रवींद्र नामदे, शरद लुणावत, युनिक व्हिजनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, मुख्याध्यापिका रजनी दुवेदी व संयोजक नगरसेविका आश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते. दहावी व बारावीमधील ७० टकक्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थांचा, तसेच पीएच़डी़, सी़ए़, वकील, एमपीएससी आदी परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण ७२८ विद्यार्थांचा स्मृतिचिन्ह व शिक्षण उपयोगी साहित्य देऊन सन्मान केला.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘यश मिळाल्यानंतर होणाऱ्या कौतुकाचा आनंद मोठा आहे. हे कौतुक आणखी चागले काम करण्याची प्रेरणा देईल. प्रास्ताविक संयोजिका आश्विनी चिंचवडे व आभार प्रदर्शन गजानन चिंचवडे यांनी केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

माणूस म्हणून कसे श्रेष्ठ व्हावे, याविषयी मार्गदर्शन केले. सोलापूरकर म्हणाले, ‘‘पिढी सुसंस्कृत व संस्कारक्षम व्हावी याकरिता पालकांनी जागृत राहिले पाहिजे. कोणतीही व्यक्ती जन्मत: गुणवंत नसते, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आई, वडील व शिक्षक यांचे योगदान महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवावे. यशाने हुरळून न जाता कठोर परिश्रम घेऊन पुढील यशाची शिखरे पादक्रांत करावीत. अभ्यासात हुशार असणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होईलच असे नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अभ्यासाचा ताण न घेता आवडत्या क्षेत्रात भविष्य घडवायला हवे. पालकांनीही आपल्या गोष्टी विद्यार्थ्यांवर लादू नयेत.
- राहुल सोलापूरकर, ज्येष्ठ अभिनेते
 

Web Title: Parents should pay attention to the overall development - Rahul Solapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.