निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी मानवी साखळी, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:53 AM2017-08-12T02:53:40+5:302017-08-12T02:53:40+5:30

प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सेवा निगडीपासून सुरू करावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. याला शहरातील विविध संस्थांच्या सभासदांनी हजेरी लावत आपला पाठिंबा दर्शवला.

 Organizing a human chain, Pimpri-Chinchwad Citizen Forum for Nigdi Metro | निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी मानवी साखळी, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे आयोजन

निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी मानवी साखळी, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे आयोजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सेवा निगडीपासून सुरू करावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. याला शहरातील विविध संस्थांच्या सभासदांनी हजेरी लावत आपला पाठिंबा दर्शवला.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून, मार्ग पिंपरीपर्यंतच आणण्यात येणार आहे. निगडी बसस्थानकावरून पुणे शहराकडे जाण्यासाठी बसगाड्या क्षमतेपेक्षा जास्त भरून जातात. तसेच या भागात शैक्षणिक संकुले, शासकीय कार्यालये, कामगार निवासस्थाने, शहरातील पर्यटनस्थळे, वाहतूक नगरी व अन्य महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे, असे फोरमच्या सभासदांचे म्हणणे आहे.
या मानवी साखळीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यामध्ये पोलीस नागरिक मित्र, ज्येष्ठ नागरिक संघ, सिद्धिविनायक नगरी, संस्कार प्रतिष्ठान, रोटरी क्लब आॅफ चिंचवड मोरया, सावरकर मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पतंजली योग समिती, सुप्रभात मित्र परिवार ग्रुप दुर्गा टेकडी, नवयुग शैक्षणिक व साहित्य मंडळ निगडी-प्राधिकरण, भावसार व्हिजन, निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरम, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी-चिंचवड, घरकुल फेडरेशन, ग्राहक पंचायत, रोटरी क्लब आॅफ निगडी, लायन्स क्लब पुणे निगडी, रेडझोन संघर्ष समिती, जलदिंडी, सांगली जिल्हा मित्र मंडळ प्रतिष्ठान इत्यादी संघटनांचे सभासद उपस्थित होते.

‘पुणे मेट्रो निगडीपासून सुरू व्हावी’ अशा मागणीचे फलक नागरिकांनी हातात घेतले होते. केवळ फलकांच्या माध्यमातून जनजागृती करत कसलीही निदर्शने अथवा घोषणा न देता शांततेच्या मार्गाने ही मानवी साखळी काढण्यात आली. पुणे मेट्रो पहिल्या फेजमध्ये निगडीपर्यंत पोहोचली, तरच पिंपरी-चिंचवड शहराला पूर्णपणे न्याय मिळणार आहे. गर्दीचा आणि त्रासाचा प्रवास सुखकर करण्याची हीच खरी वेळ आहे, अशा प्रकारचे संदेश फलकाच्या माध्यमातून या वेळी देण्यात आले.

Web Title:  Organizing a human chain, Pimpri-Chinchwad Citizen Forum for Nigdi Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.