आॅनलाइन विवाह जुळविणे पडले महागात, महिलेने घातला दीड लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:39 AM2017-11-23T01:39:52+5:302017-11-23T01:41:51+5:30

पिंपरी : विवाह जुळविणा-या संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे एका महिलेने तरुणाशी संपर्क साधून पैशाची तातडीची गरज असल्याचे कारण पुढे करीत तरुणाला तिच्या खात्यात दोन लाख रुपये भरण्यास भाग पाडले.

Online marriage was to be matched; | आॅनलाइन विवाह जुळविणे पडले महागात, महिलेने घातला दीड लाखाचा गंडा

आॅनलाइन विवाह जुळविणे पडले महागात, महिलेने घातला दीड लाखाचा गंडा

Next

पिंपरी : विवाह जुळविणा-या संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे एका महिलेने तरुणाशी संपर्क साधून पैशाची तातडीची गरज असल्याचे कारण पुढे करीत तरुणाला तिच्या खात्यात दोन लाख रुपये भरण्यास भाग पाडले. ही रक्कम महिलेच्या खात्यात जमा केल्यानंतर मात्र महिलेने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे, मोबाइलवर प्रतिसाद देण्याचे टाळले. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात महिलेविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश विलास पाटील (वय ३६, रा. जुनी सांगवी) असे फिर्याद दाखल करणाºया तरुणाचे नाव आहे. या तरुणाने आॅनलाइन विवाह जुळविणाºया संस्थेकडे नोंदणी करून संकेतस्थळावर स्वत:ची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे काव्या नावाच्या महिलेने पाटील यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. व्हॉट्स अ‍ॅपवर त्या महिलेने पाटील यांच्याबरोबर संपर्क वाढवला. त्यांचा विश्वास संपादन केला.
व्हॉट्स अ‍ॅपवर पाटील यांना संपर्क साधून वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून, वैद्यकीय उपचारासाठी पैशांची अत्यंत गरज आहे, असे सांगितले.
एवढेच नव्हे, तर रक्कम आपल्या बँक खात्यात आॅनलाइन जमा करण्यास सांगितले. भावनिक होऊन पाटील यांनी संबंधित महिलेने सांगितलेल्या युनियन बँकेच्या एका खात्यात सुरुवातीला दीड लाख रुपये जमा केले. १५ दिवसांचा अवधी गेल्यानंतर त्या महिलेने आणखी ५०
हजार रुपयांची गरज असल्याचे पाटील यांना कळविले. पाटील
यांनी महिलेने मागणी केल्यानुसार आणखी ५० हजार रुपये खात्यात जमा केले.
दोन लाख रुपये महिलेने सांगितलेल्या खात्यावर जमा केल्यानंतर मात्र महिलेने २३ आॅक्टोबरपासून पाटील
यांच्याशी संपर्क तोडला. पाटील यांच्या फोनला प्रतिसाद देणेही बंद केले. पैसे मिळाल्यानंतर
महिलेने संपर्क साधणे बंद केल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.
महिलेचा पत्ता माहिती नसल्याने तिच्यापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे पाटील यांनी थेट सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
>पतपेढीतील २५ हजारांचा मुद्देमाल लंपास
पिंपरी : शिवसह्याद्री सहकारी पतपेढीच्या संभाजीनगर येथील कार्यालयाचे ग्रील उचकटून कार्यालयातून चोरट्याने राऊटर मशिनसह सुमारे २५ हजारांचा मुद्देमाल लांबविला. ही घटना सोमवारी रात्री घडली. पतपेढीचे व्यवस्थापक शंकर शेलार (वय ३३, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, संभाजीनगर या शाखेच्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सातच्या सुमारास पतपेढीचे कार्यालय बंद झाले होते. त्यानंतर रात्री अज्ञात चोरट्याने कार्यालयाचे लोखंडी ग्रील उचकटून आत प्रवेश केला. कार्यालयातील इंटरनेट यंत्रणेतील काही उपकरणे आणि अन्य माल असा एकूण २५ हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Online marriage was to be matched;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.