'नाईट शूट' करण्याची ऑफर फाेटाेग्राफरला पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 05:48 PM2019-01-12T17:48:48+5:302019-01-12T17:54:26+5:30

कॅमेऱ्याने ‘नाईट शुट’ करण्याच्या बहाण्याने फोटोग्राफर व त्याच्या मित्राला निर्जनस्थळी नेत त्यांना बेदम मारहाण करुन एक लाख रुपयांचा ऐवज चौघांनी लंपास केला.

offer of night shoot cost a big to photographer | 'नाईट शूट' करण्याची ऑफर फाेटाेग्राफरला पडली महागात

'नाईट शूट' करण्याची ऑफर फाेटाेग्राफरला पडली महागात

Next

पिंपरी : कॅमेऱ्याने ‘नाईट शुट’ करण्याच्या बहाण्याने फोटोग्राफर व त्याच्या मित्राला निर्जनस्थळी नेत त्यांना बेदम मारहाण करुन एक लाख रुपयांचा ऐवज चौघांनी लंपास केला. ही घटना दिघीतील काळजेवाडी रोड व आळंदी सेवा रस्ता या दरम्यान गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.

सुरज अनिल कांबळे (वय २१, रा. पर्वती निवास, भोसरी) व त्यांचा मित्र तेजस यांना मारहाण झाली. याप्रकरणी चार आनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी कांबळे हे फोटोग्राफर आहेत. आरोपींनी ‘नाईट शुट’ करण्याच्या बहाण्याने कांबळे व त्यांच्या मित्राला कॅमेरयासहित बोलावून घेतले. त्यानंतर ‘रो हाऊस’वर चला असे सांगत मिलिटरी एरिया मधील निर्जनस्थळी दोघांना घेवून गेले. त्याठिकाणी गेल्यानंतर डोळयात मिरची पूड टाकून सुरज कांबळे व तेजस यांना दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील कॅमेरे, मोबाईल फोन व रोकड असा एकूण ९९ हजार ४२० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरु आहे.

 

Web Title: offer of night shoot cost a big to photographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.