निकिता रोकडे, मॉन्टी बोथ यांची निवड, राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:06 AM2017-11-29T03:06:19+5:302017-11-29T03:06:31+5:30

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भोसरी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित

 Nikita Rokde, Monty Botha, state-level boxing competition | निकिता रोकडे, मॉन्टी बोथ यांची निवड, राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

निकिता रोकडे, मॉन्टी बोथ यांची निवड, राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

googlenewsNext

पिंपरी : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भोसरी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या ६४ किलो वजनी गटात निकिता रोकडे हिने तर १९ वर्षांखालील मुलांच्या ९१ किलो वजनी गटात मॉन्टी बोथ याने अव्वल स्थान पटकाविले. स्पर्धा दि. १८ ते २५ नोव्हेंबर २०१७ कालावधीत वसंतराव नाईक जिल्हा क्रीडा संकुल अकोला येथे झाल्या.
अव्वल स्थान पटकाविलेल्या दोन्ही खेळाडूंची जानेवारी २०१८ मध्ये होणार असलेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. मुलींच्या १९ वर्षांखालील ८१ किलो वजनी गटात चैतन्या दिंडे हिने द्वितीय तर ५४ किलो वजनी गटात अंजली पवार हिने तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व प्रा. गणेश चव्हाण यांनी विशेष मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे, सचिव विश्वनाथ कोरडे, अजित गव्हाणे, विश्वस्त प्रताप खिरीड, प्राचार्य गौतम भोंग, उपप्राचार्य दादासाहेब पवार, अश्विनी भोसले व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी अभिनंदन केले.

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत राजेश पवार अव्वल

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, रायगडद्वारा आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात पिंपरी येथील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयातील राजेश पवार याने ७३ ते ७८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धा दिनांक १८ ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत अलिबागमधील जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे झाल्या. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्षा नलिनी गेरा, मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी, उपमुख्याध्यापिका कैलास सोनवणे यांनी अभिनंदन केले.

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन
निगडी : केन-ई-माबुनी शिटो-रियो कराटे स्कूल व दि स्पोर्ट्स कराटे दो असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या वतीने रविवार (दि. ३ डिसेंबर) रोजी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा निगडीतील मीनाताई ठाकरे स्केटिंग हॉल येथे होणार असून, स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होणार आहे. स्पर्धेत मुंबई येथे होणाºया आॅल इंडिया कराटे फेडरेशन आयोजित नॅशनल फेडरेशन कप २०१७ साठी निवड चाचणीसुद्धा होणार आहे. स्पर्धा वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या नवीन नियमावली तसेच वयोगट व वजनगटानुसार होणार आहे. स्पर्धा काता व कुमिते या दोन्ही प्रकारात होणार असून, स्पर्धकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवणे आवश्यक आहे.

Web Title:  Nikita Rokde, Monty Botha, state-level boxing competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.