रिक्षात बसण्याच्या वादातून हाणामारी करणाऱ्या टोळक्यावर पिंपरीतील चिखलीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 05:02 PM2017-12-25T17:02:32+5:302017-12-25T17:05:21+5:30

रिक्षात बसण्याच्या वादातून रिक्षाचालक आणि त्याच्या मुलाशी वाद घालुन नंतर नऊ ते दहा जणांच्या टोळक्यासह येऊन त्यांनी बापलेकांना जबरी मारहाण केली. 

the nigdi police filed a complaint against the caboodle | रिक्षात बसण्याच्या वादातून हाणामारी करणाऱ्या टोळक्यावर पिंपरीतील चिखलीत गुन्हा दाखल

रिक्षात बसण्याच्या वादातून हाणामारी करणाऱ्या टोळक्यावर पिंपरीतील चिखलीत गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देचिखली येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली घटना निगडी पोलिसांनी आरोपींवर बेकायदा शस्त्र बाळगणे, मारामारी करणे असे गुन्हे केले दाखल

पिंपरी : रिक्षात बसण्याच्या वादातून रिक्षाचालक आणि त्याच्या मुलाशी वाद घालुन नंतर नऊ ते दहा जणांच्या टोळक्यासह येऊन त्यांनी बापलेकांना जबरी मारहाण केली. कोयत्याने वार करून त्यांना जखमी करण्याची ही घटना चिखली येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश उर्फ सोन्या मोरे, जुनेद नाईकवाडे, अनिकेत प्रकाश रणदिवे, अतिश उर्फ मुन्ना बलदेव कोरी, वाजीद शेख, आक्या बॉण्ड, आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर, वसीम हारुण शेख, विशाल खराते या आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नझीम करीमसाब शेख (वय ६४, रा. तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे.
शेख व त्यांचा मुलगा सद्दाम हे रिक्षाजवळ बोलत असताना अनिकेत व मन्नु उर्फ मन्या तेथे आला. त्याने रिक्षात बसण्यावरुन सद्दाम याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यात वादंग सुरू झाले. काही वेळाने अनिकेत याने त्याच्या साथीदारांना तेथे बोलावून घेतले. अनिकेतचे साथीदार तेथे आले, धमकी देत त्यांनी सद्दाम यांच्या डोक्यात मागील बाजूस व शेख यांच्या डाव्या बरगडीवर वार केले. दोघेही गंभीर जखमी झाले. निगडी पोलिसांनी आरोपींवर बेकायदा शस्त्र बाळगणे, मारामारी करणे असे गुन्हे दाखल केले असून सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड पुढील तपास करीत आहेत.

Web Title: the nigdi police filed a complaint against the caboodle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.