महापौर राहुल जाधव यांना सामोरे जावे लागले स्थानिक नागरिकांच्या रोषाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:53 AM2018-12-11T02:53:02+5:302018-12-11T02:53:28+5:30

पाहणी दौऱ्यादरम्यानचा प्रकार; रावेत येथील स्मशानभूमीला स्थानिक नागरिकांचा विरोध

Mayor Rahul Jadhav faced the resignation of the local residents | महापौर राहुल जाधव यांना सामोरे जावे लागले स्थानिक नागरिकांच्या रोषाला

महापौर राहुल जाधव यांना सामोरे जावे लागले स्थानिक नागरिकांच्या रोषाला

Next

रावेत : महापौर राहुल जाधव शहरातील स्मशानभूमी आणि दशक्रिया घाटांचा पाहणी दौरा करीत आहेत. या अनुषंगाने महापौर राहुल जाधव यांनी रावेत येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या प्राधिकरणातील सेक्टर ३२ अ मधील स्मशानभूमी बांधकामास भेट दिली. या वेळी येथील रहिवाशांनी याला विरोध केल्याने महापौरांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

राहुल जाधव यांनी स्मशानभूमी पाहणी दौºयांतर्गत रावेत येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमीची महापालिका अधिकाºयांसह पाहणी केली. या वेळी परिसरात राहणाºया शेकडो महिला आणि नागरिकांनी येथे स्मशानभूमी करू नये अशी मागणी करीत नियोजित स्मशानभूमीच्या कामाला विरोध केला. महापौरांसोबत नागरिकांनी याबाबत सविस्तर चर्चा केली. नगरसेविका संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर उपस्थित होत्या. वास्तुशास्त्रानुसार घराजवळ स्मशानभूमी असू नये, ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. रावेतकरांना बहुप्रतीक्षित स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक ३२ अ मधील जाधव घाटाजवळच्या आरक्षित जागेवर अत्याधुनिक गॅसवरील शवदाहिनीसह स्मशानभूमी विकसित होणार आहे. मात्र, या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे. रावेत, प्राधिकरण, शिंदे वस्ती, वाल्हेकरवाडी आदी भागांतील नागरिकांना रावेत येथील पंपिंग स्टेशन, निगडी किंवा चिंचवड येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागते. अपुºया सोयीसुविधांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

स्मशानभूमी दृष्टिक्षेपात...
नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्र. ३२ अ मधील वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आधुनिक शवदाहिनी
कामाचा आदेश -१९ जून २०१८
कामाची मुदत - १८ महिने
क्षेत्र -पेठ क्र. ३२ अ मधील आरक्षण क्र. ५९६ जागेचे एकूण क्षेत्र ९१२५.६० चौरस मीटर
खर्च - ४ कोटी ६२ लाख ४८३ रुपये

कामावरील सर्व खर्च प्राधिकरण देणार
नवनगर विकास प्राधिकरणाने महापालिकेकडे स्मशानभूमी बांधून मिळण्यासाठी विनंती केली़
सीमाभिंत, अंतर्गत लँडस्केपिंग, रस्ते, इमारत, मुख्य प्रवेशद्वार, टॉयलेट, वाचमन केबिन आदी बाबींचा स्थापत्यविषयक कामकाजाचा समावेश
सदरची शवदाहिनी ही वायुनियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आहे.

महापालिकेच्या माध्यमातून रावेत परिसरासाठी अत्याधुनिक सुविधेची पर्यावरणपूरक स्मशानभूमी आणि उच्च प्रतीचे गार्डन तयार करण्यात येणार आहे. नागरिकांचा विरोध होणे साहजिक आहे. परंतु येथील विकास करताना निश्चित नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल. रहिवाशांच्या दृष्टीने स्मशानभूमीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- राहुल जाधव, महापौर

१९९५च्या विकास आराखड्यानुसार स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. हे काम पालिकेला दिले असून, ३ कोटी रक्कम महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण होईल. स्मशानभूमीला चोहोबाजूंनी उंच संरक्षण भिंत बांधणार आहोत. तशी सूचना महापालिकेला दिली आहे.
- सतीशकुमार खडके, मुख्य अधिकारी, प्राधिकरण

परिसरात अत्याधुनिक स्मशानभूमी होत आहे, ही सर्वांसाठी चांगली गोष्ट असली, तरी स्थानिकांना याचा त्रास आयुष्यभर होणार आहे. नागरिकांचा याला विरोध होणे रास्त आहे. स्थानिकांना त्रास होत असेल, तर माझाही याला विरोध असेल. यामुळेच मी महापौरांच्या भेटी दरम्यान अनुपस्थित राहिलो.
- मोरेश्वर भोंडवे, राष्ट्रवादी, नगरसेवक

आम्ही घर घेताना प्राधिकरणाचा भाग असल्याने येथे घेतले आहे. पाच वर्षांपासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत. इमारतीसमोरील प्राधिकरणाच्या जागेत स्मशानभूमीचे आरक्षण आहे. याबाबत आम्हाला प्रशासनाने कोणतीच पूर्वकल्पना दिली नाही. रहिवासी झोनपासून केवळ ३० मीटर अंतरावर स्मशानभूमी असणे हे कोणत्या नियमानुसार आहे. आमच्या व कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. प्राधिकरण भागात घर घेण्याच्या आमच्या उद्देशाला प्रशासनाने हरताळ फासला आहे.
- अर्चना सुराणा, हार्मोनी सोसायटी, रावेत

रहिवाशांच्या दृष्टीने स्मशानभूमी घातक आहे. स्मशानभूमी बाबत आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही येथे लाखो रुपये घालून घर घेतले. येथील स्मशानभूमीला आमचा विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत येथे स्मशानभूमी होऊ देणार नाही.
- सुनील सावंत, अध्यक्ष,
पवनी प्राइड सोसायटी, रावेत

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची ही जागा असून, या जागेवर प्राधिकरणाचे स्मशानभूमीचे आरक्षण आहे. हे आरक्षण विकसित करण्यासाठी प्राधिकरणाने महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रस्तावित खर्चातील काही रक्कम प्राधिकरणाने महापालिकेकडे वर्ग केला आहे. रद्दबाबतचा निर्णय प्राधिकरण प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
- हरविंदरसिंग बन्सल,
अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका

तीन हजार नागरिकांचा विरोध
या स्मशानभूमीत वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणा असेल. या कामाची जबाबदारी महापालिकेकडे असेल. या कामाचा खर्च प्राधिकरण करणार असून, दीड वर्षात हे काम पूर्ण होईल. स्मशानभूमी ही परिसरातील नागरिकांच्या सोईसाठी असली, तरी तिला शेजारील ला कासीटा, पवनी प्राइड, हार्मोनी, ध्रुव सिद्धी, रॉयल व्हीजन, ब्लूमिंग डिल, रिद्धी सिद्धी या सोसायट्यांतील जवळपास तीन हजार नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत नगरसेविका संगीता भोंडवे आणि प्रज्ञा खानोलकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

बांधकाम व्यावसायिकाने ठेवले अंधारात
सेक्टर ३२ मध्ये काही वर्षांपूर्वी विविध व्यावसायिकांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या. नव्याने विकसित होणारा आणि शांत परिसर म्हणून अनेकांनी या भागाला पसंती देत लाखो रुपये देऊन घरे घेतली. व्यावसायिकाने येथील आजूबाजूला असलेल्या आरक्षणाबाबत पुसटशीसुद्धा कल्पना येथे घर देणाºयाला सांगितले नाही. आता येथे स्मशानभूमीचे काम सुरू केल्यानंतर रहिवाशांना याबाबत समजल्यावर बांधकाम व्यावसायिकांनी आमचा केसाने गळा कापला, असे येथील रहिवाशांमध्ये चर्चा आहे.

Web Title: Mayor Rahul Jadhav faced the resignation of the local residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.