कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:28 AM2018-06-23T01:28:36+5:302018-06-23T01:28:38+5:30

कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची घटना पिंपरी येथील भुयारी मार्गालगत गुरुवारी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली.

Looted by showing fear of coo | कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटला

कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटला

Next

पिंपरी : कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची घटना पिंपरी येथील भुयारी मार्गालगत गुरुवारी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली.
याप्रकरणी गिरीश रमनानी (वय ३३, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमनानी हे दुचाकीवरून जात असताना पिंपरीतील भुयारी मार्ग येथे लघुशंकेसाठी थांबले. त्या वेळी दुचाकीवरून तिघे जण त्यांच्याजवळ आले. रमनानी यांचे मित्र शिल्लु आसवाणी यांच्या गळ्यावर कोयता लावून आसवाणी व रमनानी
यांना मारहाण केली. त्यानंतर आसवाणी यांच्या खिशातून १४ हजार ९५० रुपये काढून घेतले. तसेच रमनानी यांच्या खिशातील महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली. त्यानंतर चोरटे पसार झाले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
।लुटमारीच्या घटनांत वाढ
शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या उद्योगनगरीत अनेक कामगार रात्रपाळी करुन कंपनीतून घरी जात असताना चोरीचे प्रकार घडतात. हत्याराचा धाक दाखवून ऐवज लुटला जातो. यामुळे कामगारवर्गात भितीचे वातावरण आहे. या घटना रोखण्यासाठी शहर परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Looted by showing fear of coo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.