लेखापरीक्षण नसल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:37 AM2017-07-27T06:37:43+5:302017-07-27T06:37:43+5:30

पिंपरी- चिंचवड शहराच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना ३१ जुलै अखेरपर्यंत संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक असल्याचे आदेश सहकार उपनिबंधक कार्यालयाने यापूर्वीच दिला आहे

laekhaaparaikasana-nasalayaasa-kaaravaai | लेखापरीक्षण नसल्यास कारवाई

लेखापरीक्षण नसल्यास कारवाई

Next

भोसरी : पिंपरी- चिंचवड शहराच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना ३१ जुलै अखेरपर्यंत संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक असल्याचे आदेश सहकार उपनिबंधक कार्यालयाने यापूर्वीच दिला आहे. तरीदेखील अनेक सहकारी संस्थानी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. यावर सहकार विभागाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
शहरातील सहकारी बँका, सहकारी गृहरचना सोसायट्या, सहकारी पतसंस्था, सहकारी स्वयं रोजगार संस्था या बरोबरच इतरही सर्वप्रकारच्या सहकारी संस्थांनी आपल्या संस्थेचे लेखापरीक्षण ३१ जुलै अखेर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पण शहरातील सहकारी संस्थांची संख्या पाहता अनेक संस्थांनी अद्यापही या बाबतची तयारी केलेली दिसत नाही. या पार्श्वभूमिवर संबंधित संस्थांवर घटनात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
९७ व्या घटनादुरुस्तीनुसार ज्या सहकारी संस्थांनी मागील वर्षीचे लेखापरीक्षण करण्यासाठी अधिमंडळाच्या वार्षीक बैठकीमध्ये ठरावाद्वारे सहकार खात्याच्या नामतालिकेवरील ज्या लेखापरीक्षकाची नियुक्ती केली असेल, व सहकार विभागाला कळवले असेल अशा संस्थांना त्या लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करणे बंधणकारक असल्याचेही सांगितले आहे.
शहरातील संख्येने मोठ्या असणाºया सहकारी संस्था व त्यातील आर्थिक व्यवहाराची अनिमियतता लक्षता घेता राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून अशा संस्थांच्या लेखापरीक्षणाकडे गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळेच या संस्थांना ३१ जुलैपर्यंत आपल्या सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक केले आहे. अन्यथा सहकार कलम अन्वये दंडात्मक कारवाईक करण्याचा
इशारा दिला आहे. पिंपरी
चिंचवड शहरातील वाढत्या
गृह संस्था पाहता शहरामध्ये उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर ३ व पुणे शहर ४ अशी दोन उपनिबंधक सहकार कार्यालये
आहेत. या कार्यालयामार्फत शहरातील सर्व सहकारी संस्थांवर कायदेशीर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. त्या पार्श्वभूमिवर सहकार विभागाने लेखापरीक्षणाचे आदेश काढले आहेत.

अनेक सहकारी संस्थांकडून वेळोवेळी कळवून देखील नियमितपणे लेखापरीक्षण केले जात नाही. अशा सर्वच संस्थांनी ३१ जुलै अखेरपर्यंत आपल्या संस्थांचे लेखापरीक्षण करणे कायद्याने बंधनकारक आहे. सूचना व आदेश देऊनही कोणी सहकारी संस्था आपले लेखापरीक्षण करण्यास चालढकल करतील त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच लेखापरीक्षण अहवाल विहीत मुदतीत पूर्ण करून त्या अहवालाचा मागील व चालू वर्षाचा दोष दुरुस्ती अहवाल देखील लेखापरीक्षकांच्या शेºयासह विहीत मुदतीत कार्यालयास सादर करावा, असे सहकारी संस्था, पुणे शहर (३) च्या उपनिबंधक डॉ. शीतल पाटील यांनी सांगितले.

Web Title: laekhaaparaikasana-nasalayaasa-kaaravaai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.