एकाच नावाने दोन संस्थांमध्ये नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:56 AM2018-10-21T01:56:11+5:302018-10-21T01:56:19+5:30

काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी करीत असलेल्या आरोपीने पुण्यातील पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक शाळेतही नोकरी मिळवली.

Job in two organizations with the same name | एकाच नावाने दोन संस्थांमध्ये नोकरी

एकाच नावाने दोन संस्थांमध्ये नोकरी

Next

पिंपरी : काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी करीत असलेल्या आरोपीने पुण्यातील पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक शाळेतही नोकरी मिळवली.
एकाचवेळी दोन्हीकडे सेवेत राहून त्याने पगाराच्या रकमेपोटी २२ लाख ७५ हजार २२५ रुपये मिळविले. शासनाची त्याने फसवणूक केली. ही बाब माहीत असूनही शासनास न कळविल्यामुळे भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांच्यासह दहा जणांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या संस्थेचे महेंद्र बामगुडे (लिपिक), रवींद्र बामगुडे, नवनाथ देवकर (प्रभारी मुख्याध्यापक), संगीता पाटोळे , नवनाथ देवकर, उल्का जगदाळे, जयश्री पवार, रामदास जाधव, संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांच्याविरुद्ध वाकड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षणधिकारी पराग एकनाथ मुंडे यांनी पोलिसांकडे संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणासही अटक झालेली नाही.
या बाबतची सविस्तर माहिती अशी, यातील प्रमुख आरोपी रवींंद्र नामदेव बामगुडे हा महेंद्र नामदेव बामगुडे नावाने भाऊसाहेब तापकीर विद्यालय काळेवाडी येथे लिपिक पदावर नोकरी करीत आहे. या संस्थेत तो कायमस्वरूपी नोकरीस असताना त्याने पुणे, पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक विद्यालय महापालिका शाळा क्रमांक ३१ मध्ये सेवक पदावर नोकरी मिळवली.
एका संस्थेत कायमस्वरूपी नोकरी करीत असताना, दुसºया संस्थेला त्याबद्दल माहिती न देता, चुकीची माहिती देऊन त्याने शासनाचा दोन्ही संस्थांकडील पगार घेतला. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत त्याने शासनाची २२ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही बाब निदर्शनास आली.
>संगनमताने अपहार
भाऊसाहेब तापकीर विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब तापकीर, सचिव मल्हारी तापकीर तसेच तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक नवनाथ रामदास देवकर, उल्का रणजित जगदाळे तसेच संगीता पाटोळे, जयश्री पवार यांना ही बाब माहीत असूनही त्यांनी ती लपवली. शासनाला वेळीच माहिती देण्याचे टाळले. आरोपीने शासनाची फसवणूक केल्याचे हे कृत्य संस्थेच्या पदाधिकाºयांच्या संगनमताने अपहार झाला आहे. अशी फिर्याद शिक्षणाधिकाºयांनी दिल्यामुळे पोलिसांनी दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Job in two organizations with the same name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.