ध्वनिप्रदूषणात वाढ : कर्णकर्कश हॉर्नचे डेसिबल मोजण्याचे मशिन नसल्यामुळे कारवाईकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:25 AM2019-02-08T01:25:01+5:302019-02-08T01:25:06+5:30

शहरातील बाईकवेड्या तरुणांकडून चमकोगिरीसाठी विचित्र आवाज काढणाऱ्या हॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे.

Improvement in sonic pollution | ध्वनिप्रदूषणात वाढ : कर्णकर्कश हॉर्नचे डेसिबल मोजण्याचे मशिन नसल्यामुळे कारवाईकडे दुर्लक्ष

ध्वनिप्रदूषणात वाढ : कर्णकर्कश हॉर्नचे डेसिबल मोजण्याचे मशिन नसल्यामुळे कारवाईकडे दुर्लक्ष

googlenewsNext

- शीतल मुंडे

पिंपरी - शहरातील बाईकवेड्या तरुणांकडून चमकोगिरीसाठी विचित्र आवाज काढणाऱ्या हॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. मात्र, हॉर्नच्या आवाजाचे डेसिबल मोजण्याची मशिन वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा गैरफायदा टवाळखोर तरुण घेत असून, शहरातील शाळा, महाविद्यालय व मार्केट परिसरात कर्णकर्कश आवाजाचा गोंगाट सुरू आहे.
चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी कंपनीकडून आवश्यक क्षमतेचे साधारण ८० डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे हॉर्न बसविण्यात येतात. मात्र, त्यामध्ये काही बदल करून अथवा वेगळे आवाज करणारे जादा डेसिबलचे हॉर्न बसविण्यात येतात. या वेळी वाहतूक नियम थाब्यावर बसविले जातात. या विचित्र व मोठ्या आवाजाने आजुबाजूला चालणारे नागरिक घाबरतात. मात्र, वाहतूक पोलीस संंबंधितावर कारवाई करताना दिसत नाहीत. त्याविषयी अधिक माहिती घेतली असता आवाज डेसिबलमध्ये मोजण्यासाठी मशिनची आवश्यकता असतो.
पिंपरी-चिंचवड वाहतूक परिवहन विभागाकडे या विषयी चौकशी केली. या वेळी आरटीओकडे डेसिबल मोजण्याचे मशिन उपलब्ध
नसल्याने कारवाई करता येत नसल्याची गंभीर माहिती उजेडात आली आहे. सध्या बाजारात
फॅन्सी व चायनीज हॉर्न ५०० ते ६०० रुपयांना सहजपणे मिळत आहेत. स्वस्त व जास्त आवाज करणारे
म्हणून चायनीज हॉर्नला मागणी
वाढत आहे. पिंपरीतील आॅटोमोबाईल दुकाने वा गॅरेजमधून असे हॉर्न बसवून दिले जातात.

प्राण्यांचे विचित्र आवाज...

१विविध प्राण्यांचे विचित्र आवाज, मुलाच्या रडण्याचा आवाज, सायरनचा आवाज, म्युझिकल असे विविध प्रकारचे हॉर्न दुचाकीला बसवले जातात. विशेषत: बुलेटला बंदुकीच्या गोळ्यांसारखे आवाज सोडणारे, कानठळ्या बसणारे हॉर्न बसवून घेतले जातात. चित्र-विचित्र आवाजाच्या हॉर्नमुळे पादचारी दचकतात. काही युवक रस्त्यावरून जाताना मुद्दाम व घाबरविण्यासाठी अचानक हॉर्न वाजवितात. त्यामुळे शेजारील वाहनधारकही दचकतो. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना या प्रकाराचा त्रास होत असून, अपघात होण्याचाही धोका आहे.
२शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करण्यासाठी विचित्र हॉर्न वाजवले जातात. याचा त्रास शाळा-महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना होतो. दवाखान्यांच्या परिसरातदेखील अशा कर्णकर्कश हॉर्नचा आवाज कमी होताना काही दिसत नाहीत. दवाखान्यातील रुग्णांना अशा हॉर्नचा त्रास होत असतो. तरीदेखील त्या परिसरात असे हॉर्न वाजवण्याचे प्रमाण अधिकच आहे.

गाडी चालवताना हॉर्न वाजवलाच नाही पाहिजे. ध्वनिप्रदूषणाचे परिणाम अतिशय गंभीर आहेत. कोणत्याही व्यक्तीने गाडी चालवताना हॉर्न न वाजवता गाडी चालवणे आवश्यक आहे. कारण त्याचा परिणाम लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर होतो. कोणत्याही कंपनीच्या मोटारीतील हॉर्नचे डेसिबल ८० पेक्षा अधिक नाही. त्यामुळे तरुणांनी ८० डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे हॉर्न बसवून नागरिकांना त्रास होणारे कोणतेही कृत्य करू नये. - आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

बºयाच वेळा तरुण मुले रस्त्याच्या बाजूने जाणारे पादचारी यांच्याजवळ येऊन हॉर्न जोरात वाजवतात. महिला, मुली रस्त्याने जात असतील, तर टवाळखोर मुले जवळ येऊन मोठ्या आवाजातील हॉर्न वाजवतात. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
- निहारिका उके, महिला वाहनचालक

Web Title: Improvement in sonic pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.