कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची मंत्रालयातून दखल; राबविणार ‘वेस्ट टू एनर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:29 PM2017-10-25T12:29:28+5:302017-10-25T12:41:03+5:30

पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची दखल मंत्रालयातून घेतली आहे. मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज पालिका विकत घेणार आहे.

implement 'West to Energy' in pimpri chinchwad | कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची मंत्रालयातून दखल; राबविणार ‘वेस्ट टू एनर्जी’

कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची मंत्रालयातून दखल; राबविणार ‘वेस्ट टू एनर्जी’

googlenewsNext
ठळक मुद्देकचरा जिथे निर्माण होतो, तिथेच जिरविण्यात यावा : शिवसेना वेस्ट टू एनर्जी प्रकल्प दिल्लीत प्रथम सुरू झाला. अनेक शहरात प्रकल्पाचे काम चालू आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची दखल मंत्रालयातून घेतली आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प महत्त्वाचा आहे. देशातील प्रमुख महापालिकेत हा प्रकल्प राबविला जात आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज पालिका विकत घेणार असून शहराच्या आरोग्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याचा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात आहे. मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत काळ्या यादीतील ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य निलेश बारणे यांनी  केला होता. याचे खंडन आयुक्तांनी केले आहे. दरम्यान हा प्रकल्प राबविल्यामुळे मोशीकरांना दुर्गंधीलासामोरे जावे लागणार आहे. कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच जिरविण्यात यावा अशी मागणी करत शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यास विरोध दर्शविला होता. 
मात्र, पारदर्शक कारभारचे गाजर दाखवून सत्ताधारी आणि प्रशासन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्याचा घाट घातला आहे. कामाची निविदा पूर्णपणे पारदर्शकपणे काढली आहे. निविदेसाठी दोन आठवड्याची मुदत दिली होती असे सांगत आयुक्त हार्डीकर म्हणाले, मोशी कचरा डेपोत दिवसाला साडेआठशे टन कचरा जातो. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरु झाल्यावर सहाश टन कचरा त्यामध्ये जाणार आहे. सुका आणि मिक्स कचर्‍याचा वापर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. सहाशे टन कचर्‍यापासून आठ मेगावॅट वीज निर्माण होईल. ती वीज पालिकाच खरेदी करणार आहे. हा प्रकल्प दिल्लीत प्रथम सुरू झाला. जबलपूर, सुरतमध्ये सुरू असून अनेक शहरात प्रकल्पाचे काम चालू आहे, असे हर्डीकर म्हणाले. 

पारदर्शकतेचा दावा
आरोग्याचे तीन तेरा वाजले असताना वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाच्या निविदा पारदर्शकपणे काढण्यात आल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. हर्डीकर म्हणाले, ओला कचर्‍याचा वास येतो. त्यामुळे नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे गरजेचे आहे. ओला कचरा मोशी डेपोवर आला नाही तर दुर्गंधीचा त्रास होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी ओला कचरा जिथे तयार होतो. तिथेच जिरविला पाहिजे. तसेच बांधकामाचा कचरा, इतर राडारोडा वेगळ्या पद्धतीने गोळा करण्यात येणार आहे. शहरात कचर्‍याची समस्या आहे. परंतु, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ देखील उपलब्ध नाही. तरीही, आम्ही दररोज कचरा उचलला जावा, यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रत्येक प्रभागात शंभर कर्मचार्‍यांची कमतरता आहे. लोकसंख्या दिवसें-दिवस वाढत चालली आहे. त्याप्रमाणे मनुष्यबळ वाढले नाही. दिवसातून एकवेळेस भरणारी कचरा कुंडी दोनदा भरायला लागली आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाच्या निविदा पारदर्शकपणे काढण्यात येणार आहे. कोणी काय आरोप केला याबाबत मी बोलणार नाही. माहिती चुकीची आहे.

Web Title: implement 'West to Energy' in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.