देहूत रस्ता, पदपथावरील अतिक्रमणे त्वरित हटवा -प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 01:13 AM2019-03-17T01:13:04+5:302019-03-17T01:13:26+5:30

पदपथावरील आणि रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढून घ्यावीत. यात्रेतील गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणे हटविल्यास यात्रेत घडणाऱ्या दुर्घटना दूर राहून भाविक सुरक्षित राहू शकतात.

immediately remove the encroachments on the footpath | देहूत रस्ता, पदपथावरील अतिक्रमणे त्वरित हटवा -प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

देहूत रस्ता, पदपथावरील अतिक्रमणे त्वरित हटवा -प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

Next

देहूगाव - पदपथावरील आणि रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढून घ्यावीत. यात्रेतील गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणे हटविल्यास यात्रेत घडणाऱ्या दुर्घटना दूर राहून भाविक सुरक्षित राहू शकतात, असे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले.
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या बीजोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाºया भाविकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षितता, विविध कामांचे नियोजन याचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. विविध कामांची तयारी व परिसराची पाहणी करण्यात आली. या वेळी बारवकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी अपर तहसीलदार गीता गायकवाड, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, मंडल अधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गिते, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहायक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण, संत तुकाराममहाराज संस्थानाचे विश्वस्त अभिजीत मोरे, विठ्ठल मोरे, माजी विश्वस्त नितीन मोरे, सरपंच ज्योती टिळेकर उपस्थित होते.

उपस्थित सर्व विविध शासकीय पदाधिकाºयांना पुढील बैठकीपूर्वी पूर्ण झालेल्या कामांचा आढावा लेखी स्वरूपात तहसील कार्यालय येथे सुपूर्त करण्याची सूचना देण्यात आले. अनुपस्थित राहणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी सांगितले. तसेच सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

तीन रुग्णवाहिका, तसेच एक कार्डियाक रुग्णवाहिका मागवण्यात आली असून, केंद्राकडे एक रुग्णवाहिका व १०८ ची रुग्णवाहिका उपलब्ध आहे. हॉटेल, अमृततुल्य यांची तपासणी करण्यात येत असून, पाणी शुद्धीकरण, तसेच मेडिक्लोरचे वाटप सुरू आहे.

1महावितरणचे व राज्य परिवहन मंडळाचे पदाधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांना त्वरित नोटीस देऊन तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन टिळक यांनी माहिती देताना सांगितले, की देहूगाव गाथा मंदिर ते येलवाडी दरम्यानचा रस्ता अर्धवट झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या शेतकºयांच्या जमिनीचा मोबदला शासनाकडून देण्यात आला नाही. मोबदला न मिळाल्याने हा रस्ता रखडला आहे. त्या ठिकाणी पायी रस्तावगळता संपूर्ण रिंग रोड तयार आहे. पथदिव्याचे काम सुरू आहे. १२६ युनिटचे दोन सुलभ शौचालय आहे.

2कागदोपत्री हस्तांतरित वगळता यात्रेसाठी भक्त निवास संस्थानाच्या ताब्यात देण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी इंद्रायणी नदीपात्रात असणारे जलपर्णी, शेवाळ यामुळे शुद्धीकरण फिल्टरमध्ये अडकून फिल्टरला अडचण निर्माण होते. त्यासाठी धरणातून नदी पात्रात पाणी लवकर सोडण्यात यावे, अशी मागणी केली. यात्रा काळात गावात सर्वत्र २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. यात्रा काळात प्रवासी वाहतुकीसाठी नेहमी उपलब्ध असणाºया १७ बसव्यतिरिक्त अतिरिक्त ११० बस सोडण्यात येणार आहेत. या काळात देहूरोडकडे जाणाºया बससाठी अनगडशहावली दर्ग्याजवळ व तळवडेमार्गे निगडी व आळंदीसाठी नव्याने गायरानात उभारण्यात आलेल्या वाहनतळावर बस स्थानक उभारण्यात येईल.

3इंद्रायणी नदीपात्रात राडारोडा, दगड, गाळ काढण्याचे काम सुरू असल्याने १६ किंवा १७ तारखेला धरणातून ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रासह वैकुंठस्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि गाथा मंदिर या तीन ठिकाणी २४ तास बाह्यरुग्ण विभाग सुरू असेल. यात्रेसाठी पुरेसा औषध साठा मागविण्यात आला आहे.
4यात्रेसाठी १९ तारखेपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये साध्या गणवेशातील पोलीस, गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस गस्तीवर असणार असून वाहतूक नियंत्रक पोलीस वेगळे असल्याचे पोलीस निरीक्षक धस यांनी सांगितले.श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे विश्वस्त अभिजीत मोरे यांनी वैकुंठस्थान मंदिर परिसरात चार लाख भाविक उपस्थित राहत असल्याने सुरक्षितता ठेवण्याचे, तसेच वैकुंठस्थान परिसरात पालखी प्रदक्षिणेसाठी रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली. मंदिरात बंदोबस्तासाठी असलेले चार पोलीस पूर्ववत करण्याची मागणीही केली आहे.

बैठकीतील ठळक वैशिष्ट्ये :
अनुपस्थित विविध शासकीय अधिकाºयांवर कारवाई करणार
रस्त्यांवर व पदपथावरील अतिक्रमणे हटवणार
स्वागत कमानी व फ्लेक्सवर कारवाई करणार
वाहनतळ गावाबाहेर उभारणार
वाहतूक नियंत्रक पोलिसांकडून वाहतुकीचे नियंत्रण
कडक पोलीस बंदोबस्त तैनात करणार
बीज सोहळा दिनी सायंकाळी यात्रेत साध्या गणवेशातील पोलीस व महिला पोलिसांची गस्त वाढविणार
भोंगे विक्रीला बंदी भोंगे वाजविणाºयांवर व छेडछाड करणाºया रोडरोमियोवर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात येणार
पुढील आढावा बैठक बुधवारी (दि. २०) चारला देहू ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

Web Title: immediately remove the encroachments on the footpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.