आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:48 AM2018-04-04T03:48:56+5:302018-04-04T03:48:56+5:30

मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतर राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

 Heavy lobbying for the post of Commissioner | आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग

आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग

Next

- संजय माने
पिंपरी : मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतर राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. पिंपरीचा पहिला आयुक्त होण्यासाठी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजपातील पक्षश्रेष्ठींकडे लॉबींग सुरू केले आहे.
नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक गुन्हेगारीचे प्रमाण आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून उद्योगनगरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील व भाजपाचे अमर साबळे, विधान परिषदेच्या सदस्या डॉ. निलम गोºहे, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, भोसरीचे महेश लांडगे व चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांनीही आयुक्तालयाच्या मागणी केली. अधिवेशनांत तारांकित प्रश्न व लक्षवेधी मांडून या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले होते.

Web Title:  Heavy lobbying for the post of Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.