देहूरोडमधील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:43 AM2018-04-26T06:43:28+5:302018-04-26T06:43:28+5:30

मोकळ्या मैदानात झेंडा लावून परिसरात एक धार्मिक स्थळ बांधण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेला ओटा काढून टाकण्यात आला. अनधिकृत फलकांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली.

Hammer on encroachment in Dehurod | देहूरोडमधील अतिक्रमणांवर हातोडा

देहूरोडमधील अतिक्रमणांवर हातोडा

Next

किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या धडक कारवाईत देहूरोड बाजारपेठ व देहूरोड - मामुर्डी रस्त्यावरील शितळानगर येथील संरक्षण विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले एक आरसीसी बांधकाम, तसेच तीन पत्राशेड, एक हॉटेल, दोन टपऱ्या, एक गॅरेज व एक वखार काढण्यात आली. तसेच मोकळ्या मैदानात झेंडा लावून परिसरात एक धार्मिक स्थळ बांधण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेला ओटा काढून टाकण्यात आला. अनधिकृत फलकांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू केल्यानंतर संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दाखविल्यानंतर काही अवधी देत पुन्हा वेगात कारवाई करण्यात आली. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेली कारवाई सहाला थांबविण्यात आली. कारवाई दरम्यान सुमारे तीन हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कारवाई सुरू असताना मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये देहूरोड बाजारपेठेत संरक्षण विभागाच्या जागेवर गुरुद्वाराजवळ एक आरसीसी बांधकाम सुरूअसलेल्या कामाचे वीट बांधकाम काढून आरसीसीचे कॉलम यंत्राच्या साह्याने काढून टाकण्यात आले. तसेच देहूरोड-मामुर्डी मुख्य रस्त्यालगत शितळानगर येथे संरक्षण खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले तीन पत्राशेड, एक हॉटेल, दोन टपºया, एक गॅरेज, तसेच एक वखार काढून टाकण्यात आली. येथील अनधिकृत शेड काढताना काही नागरिकांनी विरोध करून संबंधित जागा ही वन विभागाची असल्याचे सांगून कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संबंधित अधिकाºयांनी दावा फेटाळत कारवाई सुरूच ठेवली. काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना अतिक्रमण काढून घेण्यास वेळ देण्यात आली. दरम्यान, संबंधित ठिकाणी असलेल्या हॉटेलसमोर बोर्डाच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेले नळजोड तुटल्याने ते अनधिकृतपणे असल्याचे उघड झाले.
त्यानंतर पुन्हा कारवाई सुरूकरून सर्व शेड, टपºया, हॉटेल व वखार हटविण्यात आली. टपºया बोर्डाने ताब्यात घेणे अपेक्षित असताना काही नागरिकांनी रस्त्याने इतरत्र ओढत नेल्याने नागरिकांनी कारवाईबाबत शंका उपस्थित केल्या. नोटीस देऊन कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. कारवाईच्या वेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांच्यासह अतिक्रमणविरोधी पथकाचे दहा जवान, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, स्थापत्य विभागीय अभियंता प्रवीण गायकवाड, महसूल विभागासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . कारवाईसाठी एक जेसीबी यंत्र , एक डंपर , एक मालमोटार , सुरक्षारक्षक, बोर्डाच्या विविध विभागांतील तीसहून अधिक कर्मचारी उपस्थित होते .

Web Title: Hammer on encroachment in Dehurod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.