बढत्या अन् बदल्यांचा घाट,महापालिकेचा कारभार, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:25 AM2018-03-23T05:25:26+5:302018-03-23T05:26:15+5:30

महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव व उपअभियंत्यांना उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंता बढती देण्याचे प्रस्ताव अर्थपूर्ण देवाणघेवाणीतून झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Growth and transit ghat, municipal administration, high-level inquiry demand | बढत्या अन् बदल्यांचा घाट,महापालिकेचा कारभार, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

बढत्या अन् बदल्यांचा घाट,महापालिकेचा कारभार, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Next

पिंपरी : महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव व उपअभियंत्यांना उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंता बढती देण्याचे प्रस्ताव अर्थपूर्ण देवाणघेवाणीतून झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारिपदी डॉ. अनिल रॉय हे कार्यरत आहेत तसेच अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी हे देखील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. या दोघांनी शैक्षणिक अर्हता व वरिष्ठता या मुद्यावरून आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर दावा ठोकला आहे. यावर डॉ. रॉय यांच्याऐवजी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांना आरोग्य प्रमुख करण्याची शिफारस विधी समितीने सर्वसाधारणसभेला केली. त्या वेळी रॉय यांनी हा प्रस्ताव आर्थिक देवाणघेवाणीतून झाला आहे, अशी लेखी तक्रार आयुक्ताकडे केली होती.
विधी समितीच्या या ठरावास डॉ. रॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यात न्यायालयाने याप्रकरणी जैसे थे चे आदेश पालिकेला दिले होते. असे असताना महापालिका सभेत सत्ताधारी पक्षाने न्यायालयाचा आदेश बाजुला ठेवत प्रस्ताव मंजूर केला. याविषयी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘याप्रकरणी नगरसेवकांमध्ये दोन गट पडलेले असून दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा आहे. भाजपानेही राष्टÑवादीचाच कित्ता गिरविला आहे. मार्च महिन्याच्या महासभेत स्थापत्य विभागातील नऊ उपअभियंत्यांना उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंतापदी बढती दिली. या बढत्यांमागे दोन पदाधिकाऱ्यांचे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. स्थापत्य विभागातील नऊ उपअभियंत्यांना उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंतापदी बढती देण्यात आली. भाजपा पदाधिकाºयांनी त्यासाठी पेट्या घेतल्याची चर्चा रंगली आहे. अभियंता संवर्गात सध्या पदवी आणि पदविका असा शैक्षणिक अर्हतेचा वाद सुरू आहे.

एकच सेवा ज्येष्ठता यादी करण्याचे निर्देश
उच्च न्यायालयानेही शैक्षणिक अर्हतेचा वाद निकाली काढत कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांची एकच सेवा ज्येष्ठता यादी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी सुरू असतानाच सत्ताधाºयांनी बढत्या दिल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव व उपअभियंत्यांना उप सूचनेद्वारे कार्यकारी अभियंता बढती देण्याचे प्रस्ताव अर्थपूर्ण देवाणघेवाण करून मंजूर करण्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

Web Title: Growth and transit ghat, municipal administration, high-level inquiry demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.