स्मशानभूमीची वाट बनली बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:35 AM2018-07-17T01:35:37+5:302018-07-17T01:35:38+5:30

दापोडी येथील नदीच्या काठावर सुसज्ज स्मशानभूमी बांधून त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था होत आहे.

Grazing ground | स्मशानभूमीची वाट बनली बिकट

स्मशानभूमीची वाट बनली बिकट

Next

पिंपरी : दापोडी येथील नदीच्या काठावर सुसज्ज स्मशानभूमी बांधून त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था होत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला भंगाराची दुकाने उभारण्यात आली आहे. मोठमोठ्या पत्र्यांच्या शेड उभारून भंगाराचा व्यवसाय सुरू आहे; मात्र त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चिंचोळा होत आहे.
स्मशानभूमीच्या आवारात नवीन दहनशेड व निवाराशेड काही वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. सर्व सोर्इंनी युक्त अशी स्मशानभूमीची बांधणी करण्यात आली आहे. मात्र सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने अल्पावधीतच स्मशानभूमीची दुरवस्था झाली. येथील कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. त्याला आधार म्हणून कार्यालयाच्या आतून पत्रा लावला आहे.
दहनशेडजवळ मातीचा ढीग टाकला आहे. पावसाच्या पाण्यामुळे ती माती वाहत जाऊन चिखल होत आहे. शेडवर लावलेले विजेचे दिवे नाहीसे झाले आहेत. त्या ठिकाणी फक्त दिव्यांचे साठे शिल्लक आहेत. परिसरामधील पेव्हिंग ब्लॉकमध्ये अंतर असल्यामुळे त्यावर गवत उगवले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाºया नातेवाइकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
स्मशानभूमीच्या सुरक्षा भिंतीबाहेर मोठ्या प्रमाणावर कचºयाचे ढीग साचले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या भंगाराच्या दुकानवाल्यांनी अनेक निरुपयोगी कचºयाचे ढीग तेथे लावले आहेत. भंगाराचे मोठमोठे गठ्ठे करून रस्त्याच्या कडेला ठेवले जातात. भंगारात ज्या वस्तूंची विक्री होणार नाही अशा वस्तू रस्त्यावर फेकल्या जातात. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाºया नातेवाइकांना त्यामधून वाट काढावी लागते.
सुसज्ज स्मशानभूमी बांधूनही वाट बिकट झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची एक टाकी येथे बांधण्यात आली आहे. मात्र त्या टाकीला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. टाकी एकच असल्याने नातेवाइकांना ताटकळत उभे राहावे लागते.
>शेडचे बांधकाम चांगले झाले आहे, मात्र येथील स्वच्छता व रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने बघितले पाहिजे. या ठिकाणी अवैध मार्गाने गोदामे उभी राहत आहेत. त्याकडे लक्ष देऊन त्यावर कारवाई केली पाहिजे अन्यथा काही दिवसांनी स्मशानभूमीमध्ये येण्यासाठी रस्ताच राहणार नाही.
- सुधाकर शिंदे, स्थानिक रहिवासी
>प्रशासनाकडून कमतरता
स्मशानभूमी हा माणसांच्या जीवनातील संवेदनशील भाग आहे. तेथे येणारे नातेवाईक कसलीही मोठी अपेक्षा ठेवून येत नाही, तर किमान मूलभूत ज्या सोईसुविधा आहेत, त्या उपलब्ध असाव्यात अशी त्यांची इच्छा असते. मात्र, प्रशासन नेमके त्याच ठिकाणी कमी पडत आहे.

Web Title: Grazing ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.