ग्रेड सेपरेटरसाठी २ कोटींचा निधी वळवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:05 AM2017-11-06T07:05:39+5:302017-11-06T07:05:42+5:30

काळेवाडी फाटा - वाकड दरम्यान ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी महापालिका सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी मिळाली. मात्र, या कामासाठी २०१७-१८च्या अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने शहर विकास

To fund 2 crore rupees for grade separator | ग्रेड सेपरेटरसाठी २ कोटींचा निधी वळवणार

ग्रेड सेपरेटरसाठी २ कोटींचा निधी वळवणार

पिंपरी : काळेवाडी फाटा - वाकड दरम्यान ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी महापालिका सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी मिळाली. मात्र, या कामासाठी २०१७-१८च्या अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने शहर विकास आराखडा या लेखाशीर्षावरील दोन कोटी ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी वळविण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत या विषयास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. काळेवाडी फाटा येथे वाकड-कस्पटे वस्ती ते काळेवाडी दरम्यान ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहे. मात्र, या कामासाठी २०१७-१८च्या अर्थसंकल्पत तरतूद उपलब्ध नाही. या कामाला आॅक्टोबर महिन्यातील महापालिका सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या कामासाठी २०१७-१८च्या अर्थसंकल्पातील शहर विकास आराखडा या लेखाशीर्षातून भांडवली वर्गीकरण करून मिळावे, अशी मागणी महापालिका बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी २५ आॅक्टोबर रोजी लेखा विभागाला प्रस्तावाद्वारे केली आहे. शहर विकास आराखडा या लेखाशीर्षामध्ये २०५ कोटींची तरतूद आहे. त्यापैकी दोन कोटी ग्रेडसेपरेटरच्या कामासाठी वळविण्यात येणार आहेत.

Web Title: To fund 2 crore rupees for grade separator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.