fraud of lakhs due to attraction of job | नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक
नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक

पिंपरी : कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर बँक खात्यातून परस्पर सव्वा लाखाची रक्कम वर्ग करुन घेत आरोपींनी एका व्यक्तीची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
राजीव दिक्षीत व श्रीनिवास राव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन आरोपी फोन करायचे. दरम्यान, आरोपींनी रेड बुल इंडिया प्रा. लि. कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष फिर्यादीला दाखविले. त्यानंतर बँक ऑफ बडोदामधील खात्याची माहिती विचारुन घेतली. या माहितीचा वापर करुन फिर्यादीच्या बँक खात्यातून १ लाख १५ हजार ४५९ रुपये वर्ग करुन घेतले. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Web Title: fraud of lakhs due to attraction of job
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.