चार झोनसाठी दोन उपायुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शहरात विविध जागांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:15 AM2018-03-25T05:15:44+5:302018-03-25T05:15:44+5:30

पिंपरी-चिंचवड शहर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मार्गी लागला असून, आयुक्तालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शासन स्तरावर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

 For the four zones, two Deputy Commissioner, senior officials surveyed the various places in the city | चार झोनसाठी दोन उपायुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शहरात विविध जागांची पाहणी

चार झोनसाठी दोन उपायुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शहरात विविध जागांची पाहणी

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मार्गी लागला असून, आयुक्तालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शासन स्तरावर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. महाराष्टÑदिनी पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून शहरात जागेची पाहणीसुद्धा करण्यात आली आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा कारभार चार झोनमध्ये विभागला जाणार असून, पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासह चार झोनसाठी दोन पोलीस उपायुक्त ही पदे निश्चित झाली आहेत. चार झोनची जबाबदारी दोन पोलीस उपायुक्तांवर सोपवली जाणार असल्याने त्यांच्यावर अधिकचा कामाचा ताण राहील.
सुमारे ४० लाख लोकसंख्येच्या पुणे शहराचे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र उत्तर आणि दक्षिण अशा दोन विभागांत विभागलेले आहे. उत्तर विभागात पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडल १ आणि २चा समावेश आहे. तर दक्षिण विभागात परिमंडल ३ आणि ४ पोलीस उपायुक्तालयाचे क्षेत्र समाविष्ट आहे. शहराची लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. शिवाय सद्य:स्थितीत पुणे ग्रामीणला जोडलेला देहूरोड, तळेगाव, आळंदी, दिघी,चाकण हा भाग भौगोलिकदृष्ट्या विचार करता, नव्या पोलीस आयुक्तालयाला जोडणे सोईस्कर ठरणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्तावही देण्यात आलेला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या खडकी आणि चतु:शृंगी अंतर्गतचा हिंजवडी, वाकड ठाण्याची हद्दही स्वतंत्र आयुक्तालयाच्या चार झोनला जोडली जाणार आहे. आयुक्तालयाची शहर व लगतचा काही ग्रामीण भाग अशी मिळून विस्तारित हद्द होणार आहे.

विविध कक्ष : पुरेसे मनुष्यबळ होणार उपलब्ध
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस उपायुक्तालयाचे चार झोन असतील. दोन पोलीस उपायुक्तांकडे चार विभागाचा कारभार सोपविला जाईल. शिवाय प्रत्येक झोनला सहायक पोलीस आयुक्त असेल. गुन्हे शाखा, उपायुक्त प्रशासन विभाग, वाहतूक शाखा उपायुक्त असे अधिकारी कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title:  For the four zones, two Deputy Commissioner, senior officials surveyed the various places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस