निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 03:38 PM2018-07-22T15:38:58+5:302018-07-22T15:40:45+5:30

निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने चार ते पाच वाहनांची तोडफोड केली.

Four vehicles damged by mob | निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान

निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान

googlenewsNext

पिंपरी : निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने चार ते पाच वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली . वारंवार घडणाऱ्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे शरवासीय दहशतीखाली आहेत.


तीन दिवसांपूर्वीच  देहूरोड बाजारपेठेत पाच-सहा दुचाकींवरुन आलेल्या दहा-बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने वाहनांची तोडफाड करीत धुमाकुळ घातला. यासह शहरातही वाहन तोडफोडीचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी रात्री निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर येथील पीएमपी आगारासमोर उभ्या असलेल्या दोन मोटारी व दोन दुचाकींची टोळक्याने तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले . घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Four vehicles damged by mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.