पुढच्या वर्षी लवकर या...! उद्योग नगरीत गणरायाला निरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:27 PM2018-09-23T18:27:21+5:302018-09-23T18:29:04+5:30

ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरण पूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते.

Early this year ...! Message to Ganaraya in the industry town | पुढच्या वर्षी लवकर या...! उद्योग नगरीत गणरायाला निरोप 

पुढच्या वर्षी लवकर या...! उद्योग नगरीत गणरायाला निरोप 

Next
ठळक मुद्देइंद्रायणी,पवना व मुळा नदी काढच्या २६ ठिकाणी विसर्जन घाट सज्ज महानगर पालिकेच्या वतीने आरोग्य,वैद्यकीय विभाग तसेच अग्निशामक दल सज्जपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २२०० पोलीस कर्मचारी तैनात

विश्वास मोरे /पराग कुंकुलोळ 
पिंपरी-चिंचवड : ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरण पूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते.गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत उद्योग नगरीने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. 
दहा दिवसांपूर्वी गणरायाच्या आगमनाने उद्योगनगरी गणेशमय झाली होती.आज विसर्जनाचा दिवस असल्याने शहर परिसरातील इंद्रायणी,पवना व मुळा नदी काढच्या २६ ठिकाणी विसर्जन घाट सज्ज ठेवण्यात आले होते.पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने आरोग्य,वैद्यकीय विभाग तसेच अग्निशामक दल सज्ज ठेवण्यात आले होते.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २२०० पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. सीसीटीव्हीची नजर सोहळ्यावर होती.चिंचवड मधील विसर्जन मिरावणुकीची सुरवात दुपारी एक पासून झाली.तत्पूर्वी सकाळी सात वाजल्यापासूनच घरगुती गणरायाचे विसर्जन सुरू होते.पवना नदीवरील थेरगाव घाट,काकडेपार्क घाट,केजुदेवी घाट,रावेत घाट तसेच मोरया गोसावी समाधी मंदीर घाटावर विसर्जनासाठी गर्दी दिसून येत होती.
चिंचवड स्टेशन,तानाजीनगर,भोईरनगर रस्त्याने विसर्जन मिरवणुका चापेकर चौकात येत होत्या.या ठिकाणी पोलीसांच्या वतीने स्वागतकक्ष उभारण्यात आला होता.येथे येणा?्या मंडळांचे श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येत होते. स्वागत झाल्यानंतर वाल्हेकरवाडी जकतनाका मागार्ने मुरावणुका घाटाकडे मार्गस्थ होत होत्या.विसर्जन घाटावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने निर्माल्य व मूतीर्दान स्वीकारले जात होते.कृत्रिम हौदाची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. 
सायंकाळी चार नंतर विसर्जनासाठी गणेश मंडळांची संख्या वाढू लागली.वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूककोंडी होऊ नये या साठी वाहतुकीत बदल केला होता.विसर्जन मार्गावर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात होते.रस्त्याच्या मध्ये बॅरिकेट्स टाकण्यात आले होते.
ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरणपूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते.गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत उद्योग नगरीने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
----------
महापालिकेला विसर
सांस्कृतिक व संस्कृती रक्षणाचे गोडवे गाणा?्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गणेश फेस्टिवल,गणेश सजावट स्पर्धा याच बरोबर गणेश भक्तांचा स्वागत कक्ष उभारण्याचा विसर पडला आहे.सण-उत्सव साजरे करण्यावर स्वायत्त संस्थाना उच्च न्यायालयाने बंधने घातल्याने यंदा चिंचवड गावातील चापेकर चौकात असणारा महापालिकेचा स्वागत कक्ष उभारण्यात आलेला नाही.पोलीस आयुक्तालयाने उभारलेल्या स्वागत कशातूनच गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते.
---------
क्षणचित्र
१)गुलाल विरहित मिरवणूक ,पर्यावरण पूरक सजवटी वर भर
२) अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त,वाहतुकीचे नियोजन
३) पारंपरिक वाद्यांचा वापर,सीसीटीव्हीची नजर
४)गणरायाच्या निरोपाला सेल्फी ची क्रेझ 
५)   नदी प्रदूशन टाळण्यासाठी मूतीर्दान व निर्माल्यदान देण्याचे आवाहन

Web Title: Early this year ...! Message to Ganaraya in the industry town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.