मुंढे न आल्यामुळे उद्योगनगरीचे प्राधिकरण कारभा-याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:46 AM2017-11-24T00:46:49+5:302017-11-24T00:47:10+5:30

पिंपरी : उद्योगनगरीतील पीएमपी वाहतूक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार बोलावूनही अध्यक्ष तुकाराम मुंढे हे महापालिकेत आलेले नाहीत.

Due to lack of business, the industrialization authority is not functioning due to lack of funds | मुंढे न आल्यामुळे उद्योगनगरीचे प्राधिकरण कारभा-याविना

मुंढे न आल्यामुळे उद्योगनगरीचे प्राधिकरण कारभा-याविना

googlenewsNext

पिंपरी : उद्योगनगरीतील पीएमपी वाहतूक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार बोलावूनही अध्यक्ष तुकाराम मुंढे हे महापालिकेत आलेले नाहीत. तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शासनाने सोपवून एक महिना झाला. तरीही ते रुजू झालेले नसल्याने उद्योगनगरीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.
पुण्यातील महापालिकेतील सर्वसाधारण सभेतून पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंढे निघून गेले. अत्यंत कार्यक्षम अशी त्यांची ओळख असली, तरी उद्योगनगरीच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. पिंपरी महापालिका पीएमपीला एकूण खर्चापैकी ४० टक्के रक्कम देते. मात्र, त्या तुलनेत शहराला सुविधा मिळत नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीच्या कर्मचा-यांच्या बदल्या पुण्यात केल्या आहेत आणि पुण्यातील कर्मचा-यांच्या पिंपरीला. संचयन तुटीचे कारण दाखवून पिंपरीतील अनेक मार्ग बंद केले आहेत. पुणे-मुंबई महामार्ग सोडला, तर शहरातील अंतर्गत भागातील बस वाहतूक कोलमडली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात जुन्या गाड्या पाठविल्या जात असल्याने रस्त्यावरच बंद पडून प्रवाशांची गैरसोय होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांचे बस पास आणि गाड्या वेळेवर न येण्याच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. तुकाराम मुंडे यांनी प्राधिरणाचा पदभार स्वीकारला असता, तर त्यांना इथले प्रश्न सोडविता आले असते.
मुंढेंची नियुक्ती झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांचे प्रश्न सुटतील आणि नागरिकांना चांगली प्रवासी वाहतूक मिळेल, अशी आशा होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. काही कालखंड महापालिकेने निधी अडविण्याचाही प्रयत्न केला होता. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महापालिकेचे महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीचे सभापती सीमा सावळे यांनी मुंढे यांना महापालिकेत बोलावले होते.
>शहरातील संस्थांचे कार्यक्रम व व्याख्याने यासाठी मुंढे यांना वेळ मिळतो. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीच्या बस वाहतुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ नाही. महापालिकेने तीन वेळा पत्र दिले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही विनंती केली आहे. मात्र, मुंढे यांनी प्रश्न जाणून घेण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि नागरिकांकडून टीकेची झोड उठविली जात आहे.

Web Title: Due to lack of business, the industrialization authority is not functioning due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.