भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणायचे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

By विश्वास मोरे | Published: February 26, 2024 12:10 AM2024-02-26T00:10:34+5:302024-02-26T00:11:02+5:30

ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केले विविध प्रश्न

Does BJP want to bring a dictatorial atmosphere in the country? Aditya Thackeray's question | भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणायचे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणायचे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले, गृहमंत्र्यांनी कि मुख्यमंत्र्यानी हे तपासायला हवे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते मग, लाठीचार्ज कशासाठी केला. आता दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी सीमेवर आहेत. तर, मनोज जरांगे मुबंईला निघालेत. जे लोक आंदोलन करतात त्यांचे ऐकून तर घ्यायला हवे. भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणण्याचे का? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना केला.

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहेर, संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे उपस्थित होते. 
... 
 महाराष्ट्राला मागे नेवून मिळवायचे काय? 
भाजपावर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'भाजपने जाती- जातीत आणि धर्मा-धर्मात विष पेरण्याचे काम सुरु ठेवले आहे. जाती-जातीत राजकारण केले जात आहे. राजकारणाचा चोथा केला आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. वातावरण दूषित केले जात आहे. मात्र, ते होणार नाही. देशापुढे महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राला मागे नेवून मिळवायचे काय आहे.' 
... 
चौकशी झाली पाहिजे
 मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत, यावर आपले मत काय? यावर ठाकरे म्हणाले, 'मला देखील तुमच्या माध्यमातून कळाले. मी जास्त बोलणार नाही थोड स्पष्ट होऊ द्या. जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले ? याची चौकशी झाली पाहिजे.' 
नितेश राणे राणे यांच्या टीकेवर विचारले असता ठाकरे म्हणाले, 'अश्या लोकांवर मी बोलत नाही, अन्यथा माझी लेव्हल खाली जाईल.' 
... 
उमेदवार हे केवळ उद्धव ठाकरे ठरवतील
मावळची उमेदवारी ठरली आहे का? यावर ठाकरे म्हणाले, 'वाघेरे यांनी चांगले नियोजन केले. मावळ लोकसभा उमेदवार कोण असेल, हे केवळ उद्धव ठाकरे ठरवतील.''  
..... 
मकाऊचा वेगळा अर्थ काढू नका
छोटे पक्ष संपवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यावर आपण त्यांचा आणि चायनाचा संबंध आहे, अशी टीका केली?  या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, त्यांचा आणि चायनाच्या जवळचा सबंध आहे. पण, तुम्ही गैरसमज करू नका, मी मकाऊबद्दल बोलत नाही. चायनामध्ये जशी लोकशाही आहे, तशी त्यांना भारतात आणायची आहे. म्हणजे लोकशाही संपवून टाकायची आहे. बाकी तुम्ही मकाऊचा वेगळा अर्थ काढू नका.'

Web Title: Does BJP want to bring a dictatorial atmosphere in the country? Aditya Thackeray's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.