गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:24 AM2018-02-18T05:24:39+5:302018-02-18T05:24:47+5:30

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक शनिवारी मोरवाडी येथील आयुक्तांच्या बंगल्यावर झाली. त्यात शहरात तब्बल तीनशे वायफाय स्पॉट आणि स्मार्ट किआॅस्क निर्माण करण्यात येणार आहेत.

Decision in the meeting of the CCTV, Board of Directors to prevent crime | गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक शनिवारी मोरवाडी येथील आयुक्तांच्या बंगल्यावर झाली. त्यात शहरात तब्बल तीनशे वायफाय स्पॉट आणि स्मार्ट किआॅस्क निर्माण करण्यात येणार आहेत. शहरातील गुन्हेगारी कमी करण्याकरिता सहाशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
स्मार्ट सिटीच्या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक सचिन चिखले, प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहायक कार्यकारी अधिकारी लक्ष्मण कोल्हे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत सहाशे ठिकाणी ह्यसीसीटीव्हीह्ण कॅमेरे
बसविण्यात येणार आहेत. त्याचे नियंत्रण पालिकेत असणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुनियोजित होण्याकरिता सर्व चौकातील सिग्नल व्यवस्था अद्ययावत केली जाणार आहे. शहरात आॅप्टिकल फायबर नेटवर्कसाठी डक्ट टाकण्यात येणार आहेत, असे सत्तारुढ गटनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

साडेसातशे किलोमीटर भूमिगत वाहिनी
एकनाथ पवार म्हणाले, पिंपळे गुरव, सौदागर आणि रावेत परिसरात साडेसातशे किलोमीटर भूमिगत वाहिनी टाकण्यात येणार आहे. तीनशे वायफाय स्पॉट आणि स्मार्ट किआॅस्क निर्माण करण्यात येणार आहेत. महापालिका व पोलीस यंत्रणा यांच्यासाठी कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर तयार करण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात ही कामे केली जाणार आहेत. या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच त्याचे काम सुरू होईल.’’

पॅन सिटीसाठी सल्लागार
बैठकीत सुरुवातीला सभावृत्तांत कायम करण्यात आला. पॅन सिटी प्रकल्पासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक, पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या जागी नयना गुंडे यांची नियुक्ती, महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी निविदाधारक संस्थेबरोबर कामकाजाचा करारनामा करून घेण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्यात आले.

पदाधिकारी अनुपस्थित
वर्षभरात स्मार्ट सिटीच्या कामास गती मिळालेली नाही. बैठका आणि प्रशासकीय कार्यवाही सुरू आहेत. कंपनीच्या सदस्यांची अनुपस्थितीही वाढू लागली आहे. पालिकेतील स्मार्ट सिटीच्या तिसºया बैठकीला अध्यक्ष डॉ. नितीन करीर अनुपस्थित होते. करीर यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. महापौर नितीन काळजे, पुणे पोलीस आयुक्त व संचालक रश्मी शुक्ला, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल हेही बैठकीस अनुपस्थित होते.

Web Title: Decision in the meeting of the CCTV, Board of Directors to prevent crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.