मुळशीत मारहाण झालेल्या कामगाराचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा होणार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:56 PM2018-02-06T14:56:33+5:302018-02-06T14:59:17+5:30

जांबे (मुळशी) येथे सोमवारी (दि ६) रस्त्यावरून जात असताना सफाई कामगाराला किरकोळ कारणावरून चौघांनी हातांनी मारहाण केली होती, त्या तरुणाचा आज सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला.

Death of a worker due to beaten in Mulshi; After the post-mortem report, the complaint will be filed | मुळशीत मारहाण झालेल्या कामगाराचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा होणार दाखल

मुळशीत मारहाण झालेल्या कामगाराचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा होणार दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी रात्री ८ च्या सुमारास तीन-चार इसमांनी त्याला लाथा बुक्क्यांनी केली होती मारहाण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दाखल करण्यात येईल गुन्हा

वाकड : जांबे (मुळशी) येथे सोमवारी (दि ६) रस्त्यावरून जात असताना सफाई कामगाराला किरकोळ कारणावरून चौघांनी हातांनी मारहाण केली होती, त्या तरुणाचा आज सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र हा आकस्मिक मृत्यू की खून हे अद्याप स्पष्ट नाही. 
अजय सहानी (वय ३५, रा. जांबे, मूळ उत्तर प्रदेश) असे त्या सफाई कामगाराचे नाव आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास त्याचे जांबे येथे भांडणे झाल्याने तीन-चार इसमांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर घरी येऊन अंग दुखत असल्याने तो पुनावळे येथे रुग्णालयात उपचार घेऊन आला. औषधेही घेतली सकाळी पुन्हा त्रास होत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला असता त्याला तिथे फिट आल्याने डॉक्टरांनी त्याला वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
हिंजवडी पोलिसांनी भांडणे झालेल्या दोघा इसमांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे हिंजवडीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांनी सांगितले.

Web Title: Death of a worker due to beaten in Mulshi; After the post-mortem report, the complaint will be filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.