राजकीय पक्षाकडून दावे-प्रतिदावे, मावळातील नऊ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:40 AM2017-10-18T02:40:54+5:302017-10-18T02:41:09+5:30

वडगाव मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची मुक्त उधळण करीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

 Claims and reactions from the political party, the results of nine Gram Panchayats in Maval | राजकीय पक्षाकडून दावे-प्रतिदावे, मावळातील नऊ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

राजकीय पक्षाकडून दावे-प्रतिदावे, मावळातील नऊ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

Next

वडगाव मावळ : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची मुक्त उधळण करीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर नसल्याने आता सर्वच पक्षांकडून यशाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सरपंचपदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कोणाची यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
तालुक्यातील इंदोरी, निगडे, गोडुंब्रे, शिरगाव, देवले, वरसोली, भोयरे, सावळा व कुणेनामा या नऊ ग्रामपंचायतींचा निकाल
मंगळवारी जाहीर झाला. थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने आणि तालुक्यातील अशा पद्धतीची प्रथमच निवडणूक असल्याने वडगाव मावळ येथील महसूल भवनाच्या परिसरात मंगळवारी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :
१) शिरगाव : सरपंचपदी मंगल सुरेश गोपाळे (७०५) विजयी, विजयी सदस्य : ढोकळे अमित अशोक ( २११) , गोपाळे वनिता भानुदास (२५९) ,गोपाळे श्वेता गोरख(२२३) , शेख समीर उस्मानभाई (१७७) , गोपाळे अमोल अप्पा(१९५), अरगडे निशा रुपेश(१६२) , आरगडे कांताबाई बाबुराव(३४८) , गोपाळे मारुती सुभाष (४०१) गोपाळे पल्लवी प्रवीण (४५८)
२) सावळा ग्रामपंचायत : सरपंचपदी गोणते नामदेव मारुती (३५०) विजयी सदस्य : साबळे भरत शंकर (१७४) ,करवंदे अश्विनी दत्तात्रेय (१६६) , शिंदे रतन गणेश (१५७)
३) इंदोरी ग्रामपंचायत सदस्यपदी पानसरे बाळकृष्ण राजू (३०९) विजयी
४) निगडे ग्रामपंचायत : सरपंचपदी भांगरे सविता बबुशा (५९१) विजयी, विजयी सदस्य : ठाकर मनीषा दत्तात्रेय(१८५), चव्हाण रामदास धोंडिबा(२२६), भांगरे मीरा संभाजी (१८६), कटपे महेश प्रभाकर (२१५), थरपुडे मनीषा भाऊ (२२३), ठाकर सीताराम देवाजी (१८२), भागवत पूजा नीलेश (१९३), भांगरे गणेश मारुती (१८५).
५) देवले ग्रामपंचायत : सरपंचपदी महेश लक्ष्मण आंबेकर (४१६) विजयी, विजयी सदस्य : फुणसे राजेश रामचंद्र (१७९), गिरी संतोष राजाराम (१६१), आंबेकर मंगल खंडू (१६४), फाटक नीलेश पांडुरंग (१९४), आंबेकर अश्विनी नीलेश (२३२)
६) भोयरे ग्रामपंचायत : सरपंचपदी बळीराम राणू भोईरकर (४६५) विजयी, विजयी सदस्य : अडिवळे समीर शिवाजी (२३०) , जांभूळकर मीराबाई बाटकू (२४४), खडके तानाजी राघू (११६), अडिवळे मंगला सोमनाथ (१२५), जांभूळकर वर्षा किसन (१६१), भोईरकर चंद्रभागा जानकु (१५२)
७) वरसोली ग्रामपंचायत : सरपंचपदी खांडेभरड सारिका संजय (५३८) विजयी सदस्य : बालगुडे अरविंद अशोक (५३८), खांडेभरड अरुणा शिवाजी (२२१), खरात बबन बुवा (३३४), खांडेभरड दत्ता यशवंत (१६९)
८) कुणे नामा ग्रामपंचायत : सरपंचपदी उंबरे संदीप वसंत (४७३) विजयी सदस्य : पिंगळे सविता नारायण (१६८), ढाकोळ संजय नाना (१७६) , शिवेकर पल्लवी भाऊ(१६३) , उघडे संजय मारुती(२३२) , वाघमारे रवी यशवंत (८५)
९) गोडुंब्रे ग्रामपंचायत : सरपंचपदी सावंत सागर बाबू ( ३२९) विजयी सदस्य : संदीप प्रकाश कदम ( ११८), दत्तात्रेय बाळकृष्ण चोरघे
(१७३) , सुरेखा संजय सावंत ( १५४) , महेश ज्ञानेश्वर सावंत (१६५)

भूमिका : पक्षाचे उमेदवार नाहीत तर गावचे सरपंच

देवले ग्रामपंचायत सरपंचपदी महेंद्र लक्ष्मण आंबेकर हे विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-शिवसेना हे तिन्ही पक्ष आंबेकर हे आपलेच उमेदवार असून, या ग्रामपंचायतीवर आपापल्या पक्षाची सत्ता असल्याचा दावा करत आहेत.
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे हे शिरगाव, देवले, सावळा, इंदोरी, कुणेनामा या ग्रामपंचायत आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आले असून, नऊपैकी पाच ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता असल्याचे मत व्यक्त करीत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ढोरे हे निगडे, देवले, गोडुंब्रे, भोयरे, वरसोली या ठिकाणी सत्ता असल्याचा दावा करत आहेत, तर याच ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजू खांडभोर आपले सरपंच निवडून आले असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे नक्की सरपंच हे कोणत्या पक्षातील यावरून तालुक्यात चर्चा रंगली आहे.
सरपंच थेट जनतेतून निवडून आल्यामुळे आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. आम्ही गाव पातळीवरच्या पॅनलमधून निवडणूक लढून निवडून आलो आहोत आम्ही कोणतेही पक्षाचे अधिकृत उमेदवार नाही त्यामुळे आम्ही पक्षाचे नाही, तर गावाचे सरपंच आहोत, अशा प्रतिक्रिया नव्याने निवडलेल्या सरपंचांनी दिला.

राजकीय उलथापालथ
या निवडणुकीत प्रथमच सरपंचपदाचे उमेदवार थेट जनतेतून निवडून आले. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या ताब्यात गावाची सत्ता गेली, याबाबत संभ्रमाचे चित्र असले, तरी निकालाचा कल पाहिल्यास ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे.
नऊ ग्रामपंचायतींच्या ८१ जागांसाठी २२५, तर सरपंच पदासाठी ५३ जणांनी अर्ज दाखल केले होते. यापूर्वी सदस्यत्वासाठी अर्ज केलेल्या ९१, तर सरपंचपदासाठी अर्ज केलेल्या २५ जणांनी माघार घेतली होती.

यापूर्वी सदस्यपदाच्या ८१पैकी ३६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४५ जागांसाठी ९८ उमेदवार, तर आठ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २७ उमेदवार रिंगणात होते. इंदोरीच्या सरपंच पदासह सदस्यांच्या १७ जागांपैकी १६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. येथे फक्त एक जागेसाठी निवडणूक झाली.

Web Title:  Claims and reactions from the political party, the results of nine Gram Panchayats in Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.