देशात परिवर्तन होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येणार :  रत्नाकर महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 08:03 PM2019-05-07T20:03:12+5:302019-05-07T20:05:21+5:30

एनडीए सरकारने असंघटीत कामगार याविषयावरील चर्चा देखील बंद केली.

change in government and congress will come to power : Ratnakar Mahajan | देशात परिवर्तन होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येणार :  रत्नाकर महाजन

देशात परिवर्तन होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येणार :  रत्नाकर महाजन

googlenewsNext

पिंपरी  : लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्ताबदल होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येईल. त्यानंतर असंघटीत कामगार व समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत असंघटीत कामगार काँग्रेसने काम करावे, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी सांगितले. 
    पिंपरीत असंघटीत कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यालयाचे उद्घाटन डॉ. महाजन यांच्या हस्ते केले. या वेळी असंघटीत कामगार काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक रमेश व्यास, निरीक्षक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस  अध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सुंदर कांबळे, शामला सोनवणे, शहराध्यक्षा शीतल कोतवाल,  मयूर जैसवाल, लक्ष्मण रूपनर, अनिरूद्ध कांबळे, विशाल कसबे, परशुराम गुंजाळ, मकरध्वज यादव,संखेश ओव्हाळ, पूजा चिंडालिया, सीमा वाल्मिकी, मंदा भवार आदी उपस्थित होते. 
    डॉ. महाजन म्हणाले, देशभर असंघटीत कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी संयुक्त पूरोगामी आघाडीचे तत्कालीन पंतप्रधान  डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अर्जूनसेन गुप्ता यांची राष्ट्रीय कमिटी स्थापन केली. असंघटीत याचा अर्थ स्वत:च्या कुटुंबाच्या चरिताथार्साठी कुठेही नोकरी न करता स्वयंरोजगार करणारी व्यक्ती. परंतू त्यांना आरोग्य, विमा व भविष्य निर्वाह निधीसारख्या सुविधा उपलब्ध नसतात. अशा व्यक्तींना सुविधा मिळवून देण्याचे काम युपीए सरकारने केले. गेल्या निवडणुकीत निव्वळ ३१ टक्के मतदान मिळविणारे एनडीएचे सरकार सत्तेत आले. या सरकारने असंघटीत कामगार याविषयावरील चर्चा देखील बंद केली. मात्र, २३ मेला होणा-या सत्तांतरानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सामान्य माणसाच्या उपयोगी असणा-या योजना जोमाने सुरु करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 
प्रास्ताविक सुंदर कांबळे, सुत्रसंचालन शीतल कोतवाल, तर आभार नितीन पटेकर यांनी मानले.

Web Title: change in government and congress will come to power : Ratnakar Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.