महापालिकेतील ‘त्या’ सीडीचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:23 AM2017-10-02T03:23:31+5:302017-10-02T03:23:43+5:30

ना भय ना भ्रष्टाचार, असे अभिवचन देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपाने पारदर्शक कारभाराच्या नावाखाली अनागोंदी कारभार सुरूच ठेवला आहे.

The 'CD' of the corporation continued to be a mystery | महापालिकेतील ‘त्या’ सीडीचे गूढ कायम

महापालिकेतील ‘त्या’ सीडीचे गूढ कायम

Next

पिंपरी : ना भय ना भ्रष्टाचार, असे अभिवचन देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपाने पारदर्शक कारभाराच्या नावाखाली अनागोंदी कारभार सुरूच ठेवला आहे. याला विधिमंडळात वाचा फोडावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या प्रकरणांची एक सीडीही दिली आहे. या सीडीत नेमके दडलय काय? याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
मागील आठवड्यात विधिमंडळाचे गटनेते पवार पिंपरी-चिंचवडच्या दौºयावर होते. त्या वेळी भापकर यांनी त्यांची भेट घेऊन पिंपरी महापालिकेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे़ या कारभाराला विधिमंडळात वाचा फोडवा, अशी मागणी केली. तसेच फाईल देऊन सीडीही दिली. पवार यांना दिलेल्या निवेदनात भापकर म्हणाले, ठेकेदारांनी केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी टक्के मागितले जात असल्याचा आरोप प्रमोद साठे यांनी केला होता. मात्र, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मार्चनंतरची बिले न स्वीकारल्याने पालिकेचे तीनशे कोटी रुपये वाचल्याचा दावा केला, याबाबत जाब विचारावा. पवना, इंद्रायणी, मुळा नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामाची, भक्ती-शक्ती उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरच्या निविदांची चौकशी करावी, वारकरी दिंडी प्रमुखांना दिलेल्या ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहार, पालिकेच्या कामांना प्रसिद्धीसाठी मीडिया सेलवर उधळपट्टी या विरोधात आवाज उठवावा, अशा मागण्या केल्या आहेत.

ठेकेदार-सत्ताधाºयांमधील संवादाची चर्चा
मारुती भापकर यांनी कागदपत्रांसोबत एक सीडीदेखील दिली आहे. त्यामुळे या सीडीत नेमके दडलयं काय? याची पालिका वतुर्ळात जोरदार चर्चा रंगली आहे. या सीडीत महापालिकेतील पदाधिकाºयांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे असून त्यावर कारवाई व्हावी, टक्केवारी प्रकरणातील संवादही आहेत, असा अंदाज आहे.
संसदीय अधिवेशनात आवाज उठविणार
माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पालिकेत गैरकारभार होत असल्याचे सांगितले आहे. त्याबाबतची कागदपत्रेदेखील दिली आहेत. त्यासबोतच एक ह्यसीडीह्ण देखील दिली आहे. सर्व कागदपत्रे वाचणार असून येणाºया विधिमंडळ अधिवेशनात विविध संसदीय आयुदांचा वापर करून या प्रकरणाला वाचा फोडणार आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे महापालिका गैरकारभाराची दखल अधिवेशनात घेतली जाणार आहे.

Web Title: The 'CD' of the corporation continued to be a mystery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.