दुकाने फोडल्यानंतर झाले सीसीटीव्ही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:59 AM2018-03-20T02:59:51+5:302018-03-20T02:59:51+5:30

येथील बाजारपेठेत पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या आर्थिक साह्यातून एक वर्षापूर्वी कॅमेरे बसविले होते. पण कॅमेरे बसविल्यानंतर काही दिवसांतच बंद झाले व गुरुवारी पहाटे कामशेतमधील काही दुकानांत चोरी झाल्यानंतर पोलिसांना कॅमेºयाची आठवण झाली व शुक्रवारी पोलिसांनी कॅमेरे दुरुस्त करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू केले.

 CCTV started after the shops broke | दुकाने फोडल्यानंतर झाले सीसीटीव्ही सुरू

दुकाने फोडल्यानंतर झाले सीसीटीव्ही सुरू

Next

कामशेत : येथील बाजारपेठेत पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या आर्थिक साह्यातून एक वर्षापूर्वी कॅमेरे बसविले होते. पण कॅमेरे बसविल्यानंतर काही दिवसांतच बंद झाले व गुरुवारी पहाटे कामशेतमधील काही दुकानांत चोरी झाल्यानंतर पोलिसांना कॅमेºयाची आठवण झाली व शुक्रवारी पोलिसांनी कॅमेरे दुरुस्त करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू केले.
कामशेत ही मावळातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. येथे परिसरातील सुमारे ७० गावांतील लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. शहरात विविध प्रकारची मोठमोठी होलसेल व रिटेल दुकाने असून, सोन्या-चांदीच्या दुकानांची संख्या जास्त आहे. मागील काही वर्षांमध्ये मोबाइल दुकानांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शहरात लोहमार्ग व जवळूनच गेलेला महामार्ग असल्याने खेडेगावातील स्थानिकांसह बाहेरील नागरिकही कामशेतमध्ये स्थायिक होऊ लागले आहेत. यातूनच शहरातील गर्दीत भर पडत असल्याने असल्याने वारंवार बाजारातील रस्त्यावर गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन अनेक
भुरटे चोर दुचाकी, मोबाइल व इतर भुरट्या चोºयांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस ठाणे परिसरातील कॅमेरा सुरूच होता; मात्र इतर चार कॅमेरे बंद होते. त्यातील छत्रपती शिवाजीमहाराज चौक व मच्छी मार्केट येथील कॅमेरे तत्काळ सुरू करण्यात आले असून, बाजारपेठ व कामशेत रेल्वे स्टेशन मार्ग या भागातील कॅमेरे तांत्रिक अडचणीमुळे नादुरुस्त असून, ते येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुरू होतील, असे कामशेत पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

...अखेर आली प्रशासनाला जाग
कामशेत बाजारात बुधवारी (दि. १४) पहाटेच्या सुमारास पाच दुकानांची चोरी व इतर एक दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. कामशेतमधील व्यापाºयांच्या आर्थिक साहाय्याने बसवलेल्या कॅमेºयाचा विषय ऐरणीवर आला. त्यानंतर कामशेत पोलिसांना कॅमेºयांची आठवण झाली. शहरात महत्त्वाच्या पाच ठिकाणी बसवलेले बंद अवस्थेतील कॅमेरे दुरुस्त करून सुरू करावेत, त्याचप्रमाणे पोलिसांनी सुरक्षिततेसाठी जागरूक राहावे, तसेच चोरी प्रकरणातील चोरांना तत्काळ पकडावे, अशा प्रकारचे निवेदन व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आले होते, अशी जोरदार मागणी करण्यात आली असता दुसºयाच दिवशी सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पोलिसांच्या वतीने सुरु करण्यात आले.

Web Title:  CCTV started after the shops broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.