‘‘भाईला नाय म्हणतो, तुझा विषय संपला आता’’ स्वयंघोषित भाईकडून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

By नारायण बडगुजर | Published: December 18, 2023 08:25 AM2023-12-18T08:25:56+5:302023-12-18T08:26:26+5:30

पिंपरी येथे बौद्धनगरमध्ये शुक्रवारी (दि. १५) रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली....

"Brother Nai says, your matter is over now" Murderous attack on young man by self-proclaimed brother | ‘‘भाईला नाय म्हणतो, तुझा विषय संपला आता’’ स्वयंघोषित भाईकडून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

‘‘भाईला नाय म्हणतो, तुझा विषय संपला आता’’ स्वयंघोषित भाईकडून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

पिंपरी : पाण्याची बाटली आणण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. स्वयंघोषित भाई आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी येथे बौद्धनगरमध्ये शुक्रवारी (दि. १५) रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.

अशोक चिंतामण डोंगरे (३०, रा. पिंपरी. मूळ रा. सावरगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरज किरवले (वय ३०), अविनाश माने (२६), गणेश जगदाळे (२०), पाशा (२०, सर्व रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डोंगरे हे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी सुरज याने डोंगरे यांना हाक मारून बोलावले. एक पाण्याची थंड बाटली घेऊन ये,  असे सुरज याने सांगितले. त्यासाठी डोंगरे यांनी नकार दिला. त्यावरून सुरज आणि त्याच्या साथीदारांनी डोंगरे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुरज भाईला नाय म्हणतो. तुझा विषय संपला आता, असे म्हणून डोंगरे यांच्या डोक्यात कोयता मारला. त्यात डोंगरे गंभीर जखमी झाले. त्यानंतर सुरज आणि त्याचे साथीदार तिथून पळून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नाली पलांडे तपास करीत आहेत.

Web Title: "Brother Nai says, your matter is over now" Murderous attack on young man by self-proclaimed brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.