रूग्णालय खासगीकरणास भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 08:15 PM2019-02-28T20:15:41+5:302019-02-28T20:16:45+5:30

पिंपरी चिंचवड महानगरपालिकमार्फत भोसरी येथे उभारलेल्या रूग्णालय खासगीकरणास भाजपाने विरोध केला आहे.

BJP opposition to privatization of hospital | रूग्णालय खासगीकरणास भाजपाचा विरोध

रूग्णालय खासगीकरणास भाजपाचा विरोध

Next

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकमार्फत भोसरी येथे उभारलेल्या रूग्णालयाच्या खासगीकरणास भाजपाने विरोध केला आहे. आज सुमारे पाच हजार नागरिकांनी भोसरीत आंदोलन केले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांसह विरोधीपक्षाने आयुक्तांना निवेदन दिले. खासगीकरणास विरोध दर्शविला. भोसरीतील रूग्णालयाच्या खासगीकरणास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. त्यापाठोपाठ भाजपातील एका गटानेही विरोध दर्शविला आहे. भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले.

निलेश मुटके, शेखर लांडगे, भरत लांडगे, आशा लांडगे, संतोष लांडे आदी सहभागी झाले होते. त्यानंतर नगरसेवक रवी लांडगे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या आंदोलनात भोसरीतील सर्वसामान्य नागरीकांसह शहारातील आधार सोशल फाऊंडेशन,वैष्णव विचार किर्तन महोत्सव समिती, नवशक्ती बालाजी ग्रुप, अखिल भारतीय छावा मराठी युवा संघटन, जय महाराष्ट कामगार सेना,महाराष्ट्र मजूर पक्ष, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, दलित स्वयंसेवक संघ इत्यादी  विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
 
रवी लांडगे म्हणाले, ‘‘आरोग्य वैद्यकीय सुविधा हि मनपाची मूलभूत सुविधा असून शहरातील गोरगरीब, झोपडपट्टीतील व सर्वसामान्य नागरीकांसाठी हि सुविधा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोतून अतिशय महत्वाची आहे. मनुष्यबळ नाही म्हणून खासगीकरण करणे योग्य आहे का? उद्या मनुष्यबळ नाही म्हणून महापालिका खासगी तत्वावर चालवायला देणार का?. खासगीकरणाने व्यावसायिक रूप प्राप्त होणार आहे.’’ 

दत्ता साने म्हणाले, ‘‘मनपाच्या वाय.सी.एम. रुग्णालयांमध्ये शहरातीलच नव्हे तर शहराबाहेरुन पुणे जिल्हातून रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. शहरामध्ये वाय.सी.एम.रुगणालयसह, तालेरा, जिजामाता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,भोसरी,आकुर्डी,यमुनानगर, इंदिरा गांधी, खिंवसरा पाटील, इत्यादी रुग्णालये सद्यस्थितीत कार्यरत असून ती समाधानकारक वैद्यकीय सुविधा शहरातील नागरीकांना पुरवित आहेत. शहरातील गोर गरीब नागरीकांना वैद्यकीय सुविधा पुरविणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्यच आहे. परंतु या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. याआधी रुबी अल केअर खाजगी संस्थेमार्फत चालविण्यास दिले आहे. त्याचा अनुभव क्लेशदायक आहे. तसेच वाय.सी.एम. रुग्णालयात लवकरच पदवीव्युतर अभ्यासक्रम चालू होणार आहे. त्यामुळे या संस्थेतून तज्ञ डॉक्टर्स मनपास उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खासगीकरण कशासाठी? आणि कोणासाठी? ’’

Web Title: BJP opposition to privatization of hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.