विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:25 AM2018-05-11T03:25:11+5:302018-05-11T03:25:11+5:30

महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा व सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विषय समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले नसल्याने सर्वंच समित्यांवर भाजपाचे सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे.

BJP dominates on Committees | विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व

विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व

Next

पिंपरी - महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा व सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विषय समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले नसल्याने सर्वंच समित्यांवर भाजपाचे सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची मुदत संपली होती. त्यांच्या जागी नवीन नगरसेवकांची मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज करणे, माघारीनंतर आज निवडणूक झाली.
विरोधी पक्ष राष्ट्रवादीने अर्ज भरला नसल्याने सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली. विधी समिती सभापतिपदी भाजपाच्या माधुरी कुलकर्णी, महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदी सीमा चौगुले आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी संजय नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी सभापतींचा सत्कार केला.

Web Title: BJP dominates on Committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.