भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 04:49 PM2024-05-06T16:49:58+5:302024-05-06T16:50:57+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या  मतदारसंघांत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटची तारीख होती. दरम्यान, या दिवशी नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात भाजपाला मोठा दिलासा मिळाला असून, येथून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Big relief for BJP, rebel former MP Harishchandra Chavan withdrew from Dindori-PC | भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या  मतदारसंघांत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटची तारीख होती. दरम्यान, या दिवशी नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात भाजपाला मोठा दिलासा मिळाला असून, येथून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतली आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. शेवटी अखेरच्या क्षणी या प्रयत्नांना यश आले. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या माघारीमुळे विद्यमान खासदरा आणि भाजपा उमेदवार भारती पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिंडोरीमध्ये भाजपाने विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी न देण्यात आल्याने तसेच पक्षाकडून निवडणूक प्रक्रियेत आपली फारशी दखल न घेतली गेल्याने हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज होते. अखेरीस या नाराजीचं रूपांतर बंडखोरीत झालं होतं. 

हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी विद्यमान खासदार भारती पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान, २०१९ मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी १ लाख ९८ हजार ७७९ मतांनी विजय मिळवला होता. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Big relief for BJP, rebel former MP Harishchandra Chavan withdrew from Dindori-PC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.