दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 07:36 PM2024-04-17T19:36:41+5:302024-04-17T19:38:11+5:30

मुंबई - बंगळुरू महामार्गावर बाणेर येथे सोमवारी (दि. १५) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली...

Bike rider dies in accident on two-wheeler, incident on Mumbai-Bangalore highway | दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना

पिंपरी : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबई - बंगळुरू महामार्गावर बाणेर येथे सोमवारी (दि. १५) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

लक्ष्मीकांत बेचन विश्वकर्मा (५४, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिस अंमलदार अविनाश उत्तम सगर यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. १६) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरून ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करीत आहेत.

Web Title: Bike rider dies in accident on two-wheeler, incident on Mumbai-Bangalore highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.