रस्ते विकासासाठी नऊ कोटी; विविध प्रकल्पांच्या कामांसाठी ४० कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 05:25 AM2018-02-15T05:25:22+5:302018-02-15T05:25:31+5:30

शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांच्या सुमारे ४० कोटी ५३ लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. वडाचा मळा विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे नऊ कोटी ७९ लाख १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

 9 crore for road development; 40 crores sanctioned for various projects | रस्ते विकासासाठी नऊ कोटी; विविध प्रकल्पांच्या कामांसाठी ४० कोटी मंजूर

रस्ते विकासासाठी नऊ कोटी; विविध प्रकल्पांच्या कामांसाठी ४० कोटी मंजूर

Next

पिंपरी : शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांच्या सुमारे ४० कोटी ५३ लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. वडाचा मळा विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे नऊ कोटी ७९ लाख १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संत तुकारामनगर, महेशनगर चौक ते अग्निशामक चौक पर्यायी रस्ता, उपरस्ते विकसित करण्यासाठी ३८ लाख ६१ हजार रुपये खर्च होणार आहे. ग प्रभागात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेले खोदकाम बुजविणे, एमपीएम, बीएम व बीसी पद्धतीने डांबरीकरण करणे यासाठी चार कोटी १३ लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणातून संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाºया १८ मीटर डीपी रस्त्यास सबवे करणे, ताब्यात येणारा १२ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करणे या कामासाठी सात कोटी ३२ लाख ७२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सांगवी-किवळे रस्त्यावर सांगवी फाटा येथे ढोरे पाटील सब वे ते औंध परिहार चौक पुलापर्यंतचा विकास आराखड्याप्रमाणे रस्ता विकसित करण्यासाठी सुमारे सात कोटी २० लाख १० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यासह ड प्रभागात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केल्याने झालेले चर एमपीएम, बीएम व बीसी पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी ३२ लाख ३६ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. ड प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी सुमारे चार कोटी ३७ लाख दोन हजार खर्च अपेक्षित आहे. अशा पद्धतीच्या रस्ते विकासाच्या कामांच्या खर्चास मान्यता दिली.

रहाटणीत वेटिंग शेडसाठी २ कोटी १५ लाख
रहाटणी गावठाण येथील स्मशानभूमीमध्ये वेटिंग शेड बांधण्यासह स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे दोन कोटी १५ लाख २० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. या शिवाय अन्य विकासकामांच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Web Title:  9 crore for road development; 40 crores sanctioned for various projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.